No icon

Daksh Police Times

हिंदुत्व व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांशी तडजोड नाही अशी भूमिका - महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ

पुणे: सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित हिंदू जनसंवाद मेळाव्यात हिंदुत्व व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांशी तडजोड केली जाणार नाही अशी भूमिका पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी मांडली.

पुणे शहरातील एकुण २७ हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने मुरलीधर मोहोळ यांच्या समर्थनार्थ बालगंधर्व रंगमंदिर येथे मोठ्या संख्येने हिंदू जनसंवाद मेळावा पार पडला. छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज व प्रभु श्रीराम यांच्या पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
सदर मेळाव्याचे प्रमुख वक्ते विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री शंकरजी गायकर यांनी श्रीराम मंदिराचा संघर्ष मांडताना हिंदू म्हणुन संघटित राहण्याचे आवाहन केले.

महायुतीचे उमेद्वार मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या भाषणात नरेंद्र मोदी यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करताना पुण्याच्या संस्कृती रक्षणाची व विकासाची गॅरेटी पटवून दिली.

सदर मेळाव्यास किशोर चव्हाण, पराग ठाकुर, दिपक नागपुरे, स्वप्नील नाईक, लोकेश कोंढरे संजय भोसले, किशोर येनपुरे, श्रीकांत शिळीमकर, अनिकेत हरपुडे यांनी मुरलीधर मोहोळ यांना पांठींबा जाहीर करीत मनोगत व्यक्त कले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महेश पवळे यांनी केले.

Comment As:

Comment (0)