No icon

Daksh Police Times

पिंपरी चिंचवड वाहतुक शाखेमार्फत काळी काच लावणाऱ्या वाहनचालकांविरोधात विशेष मोहिम.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तसेच गुन्हेगारीस आळा घालणेकरीता मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे यांचे आदेशाने व मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात चारचाकी वाहनास काळी काच लावणारे वाहनचालकांविरोधात दिनांक २९/०३/२०२४ ते ०४/०४/२०२४ दरम्यान विशेष मोहिम राबविण्यात आली असुन चारचाकी वाहनांस काळी काच (टेन्टेड ग्लास) लावलेल्या एकुण ३४३५ वाहनांवर वाहतुक विभागांमार्फत कारवाई करुन एकुण ३७,९१,५००/- रु एवढी दंड आकारण्यात आलेला आहे. तसेच यापुढे देखील अशाच प्रकारे वेगवगळ्या हेडखाली वाहतुक शाखेमार्फत विशेष मोहिम राबवून कारवाई करण्यात येणार आहे.

तरी नागरीकांनी वाहतूक नियमांचे पालन करुन त्यांचेवर होणारी दंडात्मक तसेच न्यायालयीन कार्यवाही टाळावी असे आवाहन पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेकडुन करण्यति येत आहे.

Comment As:

Comment (0)