No icon

Daksh Police Times

इंडियन ऑईल पंप व्यवस्थापकांवर 14 वर्षात 1 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप : दोघांवरगुन्हा दाखल .

पिंपरी : खेड तालुक्यातील भोसे येथील इंडीयन ऑईलच्या गुरुजी पेट्रोल पंपावर व्यवस्थापक म्हणून काम पाहणाऱ्या दोघांनी चौदा वर्षात सन 2009 ते 2023 या कालवधीत तब्बल एक कोटी रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार याप्रकरणी दोघांवर चाकण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्य़ादी यांच्या पेट्रोल पंपावर मागील चौदा वर्षापासून व्यवस्थापक म्हणून काम करत होते. आरोपींनी पेट्रोल पंप खातेदारांकडून रोख स्वरुपात पैसे घेऊन दैनंदिन सेल्सबुकमध्ये ती रक्कम ऑनलाईन मिळाल्याची खोटी नोंद केली. तसेच प्रत्यक्षात दैनंदिन पेट्रोल, डिझेलच्या नोजलची टेस्टींग न घेता, टेस्टींगच्या पेट्रोल, डिझेलचे पैसे रोख काढून पेट्रोल डिझेल शॉर्टेज नसताना शॉर्टेज असल्याचे दाखवून 96 लाख रुपयांचा अपहार केला.तसेच अपहार केल्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी संगणातील लेजरच्या नोंदी नष्ट केल्या.तसेच सेल्सबुक नष्ट करण्याच्या हेतुने गहाळ केले आहेत.
आरोपींनी पेट्रोल पंपामधून खरेदी केलेले पेट्रोल, डिझेलचे पैसे फिर्यादी यांच्या बँक खात्यात जमा न करता स्वत:च्या
बँक खात्यात जमा करुन घेतल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे.

पुढील तपास पोलीस करीत आहेत.याप्रकरणी डॉ. अविनाश शांताराम अंकुश (वय- 61 रा. सानपाडा, नवी मुंबई) यांनी गुरुवारी (दि.28) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून सिद्धार्थ भागुजी लगड (रा. मु.पो. दौंदे, ता. खेड), अद्वैत प्रताप उर्फ शैलेश रामसिरोमनी सिंग (रा. चाकण-शिकरापूर रोड, चाकण मूळ रा. रसूल, हैदरापूर उत्तर प्रदेश) यांच्यावर आयपीसी 408, 420, 201, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

 

Comment As:

Comment (0)