No icon

Pune : Daksh Police Times

शिक्षणाकरीता पुणे येथे आला अन् लॅपटॉप चोरीचे धडे शिकला :वारजे माळवाडी तपास पथकाने जेरबंद केला लॅपटॉप चोर

दिनांक २०/०१/२०२४ रोजी वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे पोलीसांनी पेट्रोलिंग दरम्यान त्यांचे गोपनीय बातमीदारांचे वातमीवरून लॅपटॉप चोरी करणाऱ्या तेजस दत्तात्रय सूर्यवंशी, वय २३ वर्षे, रा. मगनपुरा, नवमोंढा, जि. नांदेड या इसमाला ताब्यात घेतले. आरोपी तेजस सुर्यवंशी हा सुमारे ०१ वर्षापासून पुणे येथे डिएमएलटीचे शिक्षण घेण्यासाठी आला आहे. तो शिक्षणासोवत झोमॅटो कंपनीमध्ये डिलेव्हरी बॉयचे काम करायचा. डिलेव्हरीचे काम करता करता त्याने कोणत्या ठिकाणी मुलांचे होस्टेल्स आहेत, होस्टेल मधील मुले कधी बाहेर जातात, कधी रुमवर परत येतात याची चांगली माहिती मिळवली. त्यानंतर त्याने संधी साधून सदर होस्टेलवर जावून तेथे राहणाऱ्या मुलांचे लॅपटॉप व मोबाईल चोरी करण्यास सुरुवात केली. वारजे माळवाडी तपास पथकाने त्याचेकडे कसून तपास करून त्याने चोरी केलेले एकूण ०९ लॅपटॉप, ०३ मोबाईल फोन व ०१ मोटारसायकल हस्तगत करून अनेक गुन्हे उघडकिस आणून चांगली कामगिरी केली आहे.

वारजे माळवाडी तपास पथकाने आरोपी तेजस दत्तात्रय सुर्यवंशी, वय २३ वर्षे, रा. मगनपुरा, नवमोंढा, जि. नांदेड याचेकडे तपास करून खालीलप्रमाणे मालमत्तेविरुध्दचे गुन्हे उघडकिस आणलेले आहेत.
सदरची कामगिरी ही मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. प्रविण पवार, सह- पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. प्रविणकुमार पाटील साो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्री संभाजी कदम साो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०३, पुणे शहर, मा. श्री. भिमराव टेळे साो, सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग, पुणे शहर, यांचे आदेशाने वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निळकंठ जगताप यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. रणजित मोहिते, पोलीस उपनिरीक्षक श्री. रामेश्वर पार्वे तसेच अंमलदार पोलीस हवालदार प्रदिप शेलार, भुजंग इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल विजय भुरुक, बंटी मोरे, मनोज पवार, श्रीकांत भांगरे, संभाजी दराडे, विक्रम खिलारी, शिरीष गावडे, अजय कामठे, शरद पोळ, सत्यजित लोंढे व रिवाज शेख यांनी केलेली आहे.

Comment As:

Comment (0)