No icon

Pune : Daksh Police Times

बाणेर टेकडीवर नागालँडच्या महिलांना लुटणारी टोळी जेरबंद

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते नुकतेच शहरातील ७ नव्या पोलीस ठाण्यांचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर या पोलीस ठाण्यांचा कार्यभार सुरु झाला. बाणेर पोलीस ठाण्याच्या स्थापनेनंतर पहिला गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले आहे. बाणेर टेकडीवर (Baner Hill) फिरायला आलेल्या तीन महिलांना मारहाण करुन लुटणार्‍या टोळीला बाणेर पोलिसांनी अटक केली आहे. (Gang Arrest In Baner Hill Robbery Case)

द्रापेत ऊर्फ विशाल प्रभाकर समुखराव (वय १९, रा. बोराडेवाडी, जाधववाडी, चिखली मुळ रा. म्हाळुंगी, ता. चाकूर, जि. लातूर) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. बाणेर येथील टेकडीवर नागालँड येथील राहणार्‍या महिला १३ ऑक्टोंबर रोजी फिरायला गेल्या होत्या. टेकडीवरुन उतरत असताना चौघांनी त्यांना अडविले. त्यांना मारहाण करुन मोबाईल, बर्डस, सॅक असा ५१ हजार रुपयांचा माल चोरुन नेला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना आरोपींची बातमीदारामार्फत माहिती प्राप्त करुन पोलिसांनी विशाल समुखराव याला त्याच्या दोन साथीदारासह पकडले.
त्यांच्याकडून गुन्ह्यात जबरदस्तीने हिसकावून नेलेला माल व गुन्हा करताना वापरलेली मोटारसायकल,
कोयता असा १ लाख १० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा,
अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिम्मत पाटील, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रणिल चौगुले, पोलीस हवालदार श्रीकांत वाघवले, बाबुलाल तांदळे, सुधाकर माने, इरफान मोमीन, बाबासाहेब दांगडे, श्रीधर शिर्के यांनी केली आहे.

Comment As:

Comment (0)