No icon

Pune : Daksh Police Times

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीना १२ तासाचे आत घेतले ताब्यात

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीना १२ तासाचे आत घेतले ताब्यात दिनांक १९/०९/२०२४ रोजी रामोशी आळी, हडपसर, पुणे येथे एका इसमाचा खुन झाला असल्याबाबत माहीती मिळाली. प्राप्त झालेल्या माहीतीच्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन श्री. संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे, सहा. पोलीस निरिक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरिक्षक महेश कवळे, हडपसर पोलीस स्टेशन पुणे यांनी भेट दिली. घटनास्थळी अमोल ऊर्फ भावड्या मारुती माने, वय-३९ वर्षे, स.नं.२५२, रामोशी आळी, नवचैतन्य चौका शेजारी, हडपसर, पुणे हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. मयत इसम याची बहीण हिचेकडे अधिक माहीती घेता, मयत इसम हा केटरींग चे काम करीत होता व तो एकटाच राहत असलेबाबत सांगीतले. दिनांक १९/०९/२०२४ रोजी मयत अमोल माने यास वेळोवेळी फोन केला परंतु तो त्याने उचलला नाही म्हणून त्यांच्या ओळखीच्या इसमास घरी पाठवले असता अमोल माने हा रक्ताचे थारोळ्यात पडलेला दिसला. अशी हकीगत सांगून फिर्याद दिल्याने हडपसर पोलीस ठाणेस गु.र.नं.१४७३/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम १०३ प्रमाणे अनोळखी आरोपींविरूध्द गुन्हा करण्यात आला. दाखल गुन्ह्याचे गांभिर्य ओळखून श्री. संतोष पांढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व सुचनांप्रमाणे हडपसर तपासपथक अधिकारी अर्जुन कुदळे, सहायक पोलीस निरीक्षक, महेश कवळे, पोलीस उप निरीक्षक, व स्टाफ यांनी प्राप्त सीसीटीव्ही व मिळालेल्या उपयुक्त माहीतीच्या आधारे १) वैभव गणेश लबडे, वय ३१ वर्षे, रा. साईबाबा मंदिराशेजारी, हिंगणे आळी, हडपसर गाव, हडपसर, पुणे यास हडपसर भागातुन तसेच २) ज्ञानेश्वर दत्तु सकट, वय २७ वर्ष, रा. रामोशी आळी, हडपसर, पुणे यास सोलापूर येथून ताब्यात घेतले. आरोपींकडे केले तपासात मयत इसम व आरोपी हे एकमेकांचे मित्र होते. त्यांना नशापाणी करण्याचे व्यसन होते. मयत हा आरोपीस असलेल्या व्यसानाबद्दल वेळोवेळी आरोपीच्या आईला व पत्नीला सांगत असे, त्यामुळे आरोपी वैभव याचे त्याच्या आई व पत्नी बरोबर वाद होत होते. मयत हा वेळोवेळी आरोपी करत असलेल्या नशेबद्दल सांगून आई व पत्नीस मडकवत असल्यामुळे आरोपीच्या मनात मयताबाबत राग होता. त्या रागातुन आरोपीने सदरचा खुन केला असल्याची कबुली दिली आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे, हे करीत आहेत. सदरची कामगिरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ श्री.आर राजा, यांचे मागदर्शनाखाली मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग श्रीमती अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष पांढरे, पोनि (गुन्हे) निलेश जगदाळे, यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, जोतीबा पवार, समीर पांडुळे, सचिन जाधव, दिपक कांबळे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अजित मदने, चंद्रकांत रेजितवाड, अतुल पंधरकर, अमित साखरे, निलेश किरवे, अमोल दणके, कुंडलीक केसकर, तुकाराम झुंजार, अमोल जाधव यांच्या पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

Comment As:

Comment (0)