No icon

Pune : Daksh Police Times

फिनिक्स मॉल येथे फायरींगमधील आरोपीस २४ तासाच्या आत वाकड पोलीस ठाणे तपास पथकाकडुन शिताफीने अटक

दिनांक १७/०९/२०२४ रोजी सायंकाळी ०६:०० वा. चे सुमारास फिनिक्स मॉल, वाकड, पुणे येथे एका इसमाने फायरींग केलेबाबत पोलीस ठाणे येथे बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली. मिळाले बातमीप्रमाणे लागलीच वाकड पोलीस ठाणेकडील वपोनि., अधिकारी व अंमलदार फिनिक्स मॉल येथे पोहचले असता फिनिक्स मॉल, शंकर कलाटेनगर, वाकड येथील मटेरियल गेट नं. ७ येथे इसम बाळु शिंदे याने त्याचेकडील रिव्हॉल्वर मधुन फायरींग करुन कारमधून पळून गेला होता. सदर घटनेबाबत वाकड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १०२१/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ३५२, ३५१ (२), ३ (५) भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३,२५,२७ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५, क्रि.लॉ. अमेंडमेंट अॅक्ट ३,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फायरींग सारख्या गंभीर गुन्हा उघडकीस आणण्याचे वरिष्ठांनी तात्काळ आदेश दिले होते. आरोपी अक्षय ऊर्फ बाला लहु शिंदे, वय ३० वर्षे, रा. राधाकृष्ण कॉलनी, माऊली चौक, वाकड, पुणे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने तो त्याचे अस्तित्व लपून होता. वाकड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने गुन्हा घडलेपासून अथक परिश्रम घेऊन तो टिपटॉप हॉटेल समोरील सर्व्हिस रोड अंडरपास येथे सापळा लावुन ताब्यात घेतले. फायरींग केलेनंतर आरोपीने पळुन जाण्यासाठी वापरलेली कारचा चालक साथिदार रंजित नथुराम सलगर, वय २४ वर्षे, रा. मसुर, ता. कराड, जि. सातारा यास कारसह गुन्हे शाखा, युनिट ४ यास भुमकर चौक, वाकड येथून ताब्यात घेतले आहे. 

आरोपी अक्षय ऊर्फ बाला लहु शिंदे याने फिनिक्स मॉल येथे त्यास माथाडीचे काम मिळण्याबाबत पुर्वी सांगितले होते. परंतु त्याला काम न मिळाल्याने त्याने दहशत निर्माण करण्याकरिता फायरींग केल्याचे सांगितले. दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना नमूद गुन्ह्यामध्ये अटक करण्यात येत आहे. आरोपी अक्षय ऊर्फ बाला लहु शिंदे याची गुन्हेगारी पार्श्वभुमी खालिलप्रमाणे.


४३३/२०२४ भादंवि कलम ३२४, ३४,
वाकड ६३६/२०२४ भांदवि कलम ३९२,३२३,५०६,३४ प्रमाणे
फायरींग सारख्या गंभीर गुन्ह्यातील सराईत आरोपीस अथक परिश्रम घेऊन अल्पवेळात आरोपीस अटक
करण्याची उल्लेखनीय कामगिरी मा. श्री. विनयकुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. डॉ. शशीकांत
महावरकर, पोलीस सह आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, श्री. संदिप डोईफोडे, पोलीस उप
आयुक्त, गुन्हे, श्री. विशाल गायकवाड साो, पोलीस उप आयुक्त, परि-२, डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त,
गुन्हे श्री. सुनिल कुराडे, सहा. पोलीस आयुक्त साो, वाकड विभाग यांचे मार्गदर्शना खाली वाकड पोलीस ठाणेकडील
श्री. निवृत्ती कोल्हटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. संदिप सांवत, वपोनि. गुन्हे शाखा, युनिट ४, सपोनि.
प‌द्मभुषन गायवकड, पोउपनि. सचिन चव्हाण, पोउपनि अनिरुध्द् सावर्डे, पोउपनि. साळुंखे (गुन्हे शाखा) श्रेणी
पोउपनि. विभीषण कन्हेरकर, श्रेणी पोउपनि. राजेंद्र काळे, पोलीस अंमलदार वंदु गिरे, संदिप गवारी, स्वप्निल
खेतले, प्रमोद कदम, अतिश जाधव, अतिक शेख, प्रशांत गिलबिले, संतोष महाजन रामचंद्र तळपे, अजय फल्ले,
सौदागर लामतुरे, भास्कर भारती, कोतेंय खराडे, रमेश खेडकर, ज्ञानदेव झेंडे, सागर कोतवाल, मंगेश लोखंडे (परि-
२) तसेच गुन्हे शाखा, युनिट ४ चे पोलीस अंमलदार नदाफ, मुंडे, शेटे, गावंडे, गुट्टे व जायभाय यांनी मिळुन केली
आहे. सदर गुन्ह्याचा तपास सपोनि. पी.डी. गायकवाड हे करीत आहेत.

Comment As:

Comment (0)