Pune : Daksh Police Times
विधीसंघर्षीत बालकाकडून चोरीच्या माल जप्त युनिट ३ कडील वारजे माळवाडी व उत्तमनगर पोलीस कामगिरी
- By पुणे प्रतिनिधी --
- Sunday, 08 Sep, 2024 --
- View : 132
विधीसंघर्षीत बालकाकडून चोरीच्या दोन दुचाकी व चोरीचे ०७ मोबाईल हॅन्डसेट जप्त एकुण १,६०,०००/- रू चा माल गुन्हे शाखा, युनिट ३ कडून हस्तगत
दि. ०४/०९/२०२४ रोजी गुन्हे शाखा, युनिट ३ कडील पोलीस अंमलदार हे वारजे माळवाडी व उत्तमनगर पोलीस ठाणे हद्दित अवैध धंदयांवरकारवाई करणेकरीता पेट्रोलींगकरीत असताना युनिट ३ कडील पोलीस शिपाई प्रतिक मोरे यांना बातमी मिळाली की, विधीसंघर्षीत बालकाकडे चोरीची दुचाकी व चोरीचे मोबाईल हॅन्डसेट असून तो विक्रीकरीता आला असल्याची माहिती मिळाली. सदर विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेवून त्याचेकडून ०१ सुझुकी कंपनीची अॅक्सेस मोपेड व ०७ मोबाईल हॅन्डसेट मिळून आले. नमुद विधीसंघर्षीत बालकास विश्वासात घेवून केले तपासात त्याने आणखी एक केटिएम आर सी १५ ही दुचाकी चोरी केली असल्याचे सांगीतल्याने ती त्याचेकडून हस्तगत करण्यात आलेली आहे. नमुद विधीसंघर्षीत बालकाकडे मिळून आलेल्या दुचाकी व मोबाईल हॅन्डसेटयायत तपास करता सुझुकी कंपनीची अॅक्सेस मोपेडबाबत चिखली पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय गुन्हा रजि. नंबर ५०३/२०२४ भा. न्या. सं. कलम ३०३ (२) प्रमाणे तसेच केटिएम आर सी १५ बाबत सिंहगड रोड पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा रजि. नंबर १२५/२०२४ भादंविक ३७९ तसेच मिळाले मोबाईल हॅन्डसेटपैकी एक मोबाईल हॅन्डसेट हे उत्तमनगर पोलीस ठाणे, पुणे शहर गुन्हा रजि, नंबर १११/२०२४ भादंविक ३८० प्रमाणे असे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. उर्वरीत मोबाईल हॅन्डसेटबाबत तपास सुरू आहे. त्याचेकडुन एकुण १,६०,०००/-रु. किंमतीचा माल जप्त केला आहे. नमुद विधीसंधर्षीत बालकास पुढिल कारवाईकामी उत्तमनगर पोलीस ठाणेस हजर करण्यात आले आहे.
नमुद विधीसंघर्षीत बालक हा पोलीस अभिलेखावरील असून यापुर्वी त्याचे विरूध्द उत्तमनगर पो.स्टे. व वारजेमाळवाडी पो.स्टे.ला वाहन चोरीचे १० गुन्हे, तसेच १ पोस्को, व खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी ही सदरची कामगिरी, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे पुणे शहर, श्री. निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १, श्री. गणेश इंगळे यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रंगराव पवार, पो. उपनिरीक्षक महेश कोकाटे तसेच पो. हवा. शरद वाकसे, सर्जिव कळवे, केदार आढाव, गणेश सुतार, विनोद, जाधव, सोनम नेवसे, सुजित पवार पोलीस अंमलदार प्रतिक मोरे, ज्ञानेश्वर चित्ते, गणेश शिदे, हरिश गायकवाड, राकेश टेकावडे, इसाक पठाण यांनी केली आहे.