No icon

Pune : Daksh Police Times

सांगवी तपात्त पथकाची कामगिरी रेकॉर्डवरील आरोपीचे ताब्यातुन एक पिस्टल व एक जिवंत काडतुस जप्त.


दि. २७/०८/२०२४ रोजी सांगवी पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अंमलदार सुहास जंगारे, पो.कों. २२०९ यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, औंध जिल्हा आयुष रुग्णालयाचे समोर असलेले पाण्याचे टाकीजवळ, जुनी सांगवी पुणे येथे एक इसम थांबला असुन त्याने कमरेला पिस्तुल लावलेले आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळालेने सदरबाबत मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो, सांगवी पोलीस स्टेशन यांना कळवून त्यांनी सदर इसमास ताब्यात घेवुन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिलेने सांगवी पोलीस स्टेशनकडील तपास पथक अधिकारी पोलीस उप निरीक्षक ताकमाते यांनी टीम तयार करुन सापळा रचुन सदर इसमास ताब्यात घेवुन त्यास त्याचा नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव ओंकार किसन शिंगोरे, वय २४ वर्षे, रा. गांगार्डे नगर, लेन नं. २. काटेपुरम चौक, पिंपळे गुरव पुणे. असे असल्याचे सांगितले, त्याचेकडुन खालीलप्रमाणे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
१) २५,०००/- एक देशी बनावटीचे पिस्टल स्टिल सारख्या धातुपासुन बनविलेले सिल्व्हर रंग असलेले,
मुठीजवळ दोन्ही बाजुस पांढरे रंगाची प्लॅस्टिकची पट्टी असुन त्यावर काले रंगाचे स्टार अंदाजे १६ सेमी लांबीचे व मुठीजवळ अंदाजे ११ सेमी उंचीचे, मुव्हेबल स्लाईड मॅगझीन, मॅगझीन हाऊस, ट्रीगर,
मॅगझीन कॅच, हॅमर, फायरींग पीन, असे महत्वाचे पार्ट शाबुत असलेले जु.या.कि.अं. २) ५००/- एक जिवंत काडतुस त्याचे मागील बाजुस इंग्रजीमध्ये के एफ ७.६५ असे लिहिलेले जु.या. कि.अं.
२५.५००/- एकुण
सदरची कारवाई ना. विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त पिं.चि. ना. शशिकांत महावरकर सो, सह पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. वसंत परदेशी सो, अपर पोलीस आयुक्त पिं.चिं., मा. स्वप्ना गोरे मॅडम सो, पोलीस उपआयुका परिमंडळ १ पिं.चिं., मा. सचिन हिरे सो, सहा. पोलीस आयुक्त सो, पिंपरी विभाग पिं.चि. यांचे मार्गदर्शनाखाली सांगवी पोलीस स्टेशनचे श्री महेश बनसोडे साो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक ताकनाते (तपास पथक), सहा. पोलीस फौजदार वाघुले, पोहया ७३९ शिंदे, पोहवा ९४८ साळये, पोहवा १००४ ढवळे, पोहवा १११० सुपे, पोहवा ११९४ गायकवाड, पोहवा १५१२ गोडे, पोहवा १५३५ मौरे, पो.ना. १५३४ पाटील, पो.कॉ. २०११ पाटील, पो.कों, २२०९ डंगारे, पो.कॉ. ३५३८ पाईकराव यांचे पथकाने केली.

Comment As:

Comment (0)