No icon

Pune : Daksh Police Times

देशी पिस्तुल व जिवंत राऊंडसह आरोपी जेरबंद वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगीरी

 

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत बेकायदेशीर अग्नीशस्त्रे व दारुगोळा बाळगणारे, गुन्हेगारांवर कारवाई करणेबाबत मा. श्री. विनयकुमार चौबे सारे, पोलीस आयुक्त, डॉ. शशीकांत महावरकर, पोलीस सह आयुक्त, श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी आदेशीत केलेले आहे. त्यानुसार परिमंडळ २ चे पोलीस उप आयुक्त, श्री. विशाल गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त श्री. सुनिल कुराडे यांनी अवैध अग्नीशस्त्रे बाळगणाया खरेदी विक्री करणाया गुन्हेगारांवर कारवाई करिता विशेष मोहिम सुरु केली आहे.

श्री. निवृत्ती कोल्हटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी वाकड पोलीस ठाण्यातील अधिकारी/अंमलदार यांना वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणा-यांवर कायदेशीर कारवाई करणेवावत सांगितले आहे.

वाकड पोलीस ठाण्याचे तपास पथकातील पोउपनि, सचिन चव्हाण यांना त्यांचे बातमीदराकडून

गजानन नगर, रहाटणी पुणे येथे एक इसम त्याचे जवळ बेकायदेशीर पिस्तुल बाळगून आहे अशी बातमी

मिळाली होती. सदरची वातमी त्यांनी वपोनि, निवृत्ती कोल्हटकर यांना कळवून त्यांचे मार्गदर्शनाप्रमाणे

तपास पथकाचे अधिकारी अंगलदार यांचेसह बातमीदाराने दिलेल्या बातमीनुसार गजानन नगर,

रहाटणी परिसरात सापळा लावून इसम नामे गोरख प्रभु सातपुते वय २९ वर्ष रा.ठी-फिनीक्स हॉस्पीटलच्या बाजुला पवारनगर, थेरगाव वाकड पुणे यास शिताफिने ताब्यात घेतले. त्याचेकडे बेकायदेशीर देशी बनावटीचे "एक पिस्टल, एक जिवंत काडतुस" २७,०००/- रुपये किंमतीचे मिळून आले. त्याचाबत वाकड पोलीस स्टेशन गु.रजि. नं. ९३६/२०२४ भारताचा शस्त्र अधिनियम १९५९ चेकलम ३,२७ महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३) सह १३७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून नमूद गुन्ह्यात त्यास अटक करण्यात आली. सदरचे बेकायदेशिर पिस्टल त्याने कशासाठी आणलेले होते याबाबत अधिक तपास चालू आहे.

आरोपीवर एकुण ०४ गुन्हे दाखल आहेत. (१) गेवराई पो.स्टे जि.बिड गुरजिनं. ३६९/१७ भादवि कलम ३२४,३२३ (२) बाकड पो.स्टे गुरजिनं. ५६८/२० आर्म अॅक्ट कलम ४/२५ (३) सांगवी पो.स्टे गुरजिनं. २२/२२ भादवि सह कलम ३०८,३२६,३२३,३४ भा.ह. का सह कलम ४/२५ मपोका ३७(१)/१३५ (पाहीजे आरोपी) (४) वाकड पो.स्टे गुरजिनं. ६०९/२० भादविक कलम ३७६,३७६ (एन) सह, पोक्सो कायदा ३,४,५

सदरची उल्लेखनीय कामगीरी मा. श्री. विनयकुमार चौबे सारे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा.श्री. शशिकांत महावरकर सो, पोलीस सह आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. विशाल गायकवाड सारे, पोलीस उप आयुक्त, परि-२, पिंपरी चिंचवड, मा. श्री. सुनिल कुराडे, सहा. पोलीस आयुक्त सो, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शना खाली वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, पोलीस निरीक्षक गोरख कुंभार, महीला पोलीस निरीक्षक निता गायकवाड, पोउपनि. सचिन चव्हाण, पोउपनि अनिरुध्द सावर्डे, श्रेणी पोउपनि विभीषण कन्हेरकर, श्रेणीपोउपनि राजेंद्र काळे, पोलीस अंमलदार वंदु गिरे, संदिप गवारी, स्वप्निल खेतले, अतिश जाधव, प्रमोद कदम, दिपक साबळे, अतिक शेख, विक्रांत चव्हाण, प्रशांत मिलवीले, रामचंद्र तळपे, विनायक घार्गे, अजय फल्ले, सौदागर लामतुरे, कौंतेय खराडे, भास्कर भारती, रमेश खेडकर, ज्ञानदेव

झेंडे यांनी केलेली आहे.

पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-२, पिंपरी चिंचवड

Comment As:

Comment (0)