No icon

Pune : Daksh Police Times

खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखेची कामगिरी : सोशल मिडीयावर टाकलेल्या कोयत्याच्या फोटो वरुन, दरोड्याचा कट उघडकीस

मा. पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी गुन्हेगारांचे सोशल मिडीया आकाऊंटवर वाँच ठेवणेबाबत दिलेल्या आदेश व सुचनाप्रमाणे खंडणी विरोधी पथकातील अंमलदार रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे इंस्टाग्राम अकाऊंट चेक करत असतांना, पोलीस हवालदार गणेश गिरीगोसावी यांना एका इसमाने हातात दोन कोयते घेवून, दहशत माजविण्याचे उद्देशाने फोटो टाकल्याचे निदर्शनास आले. सदरबाबत त्यांना वपोनि संतोष पाटील खंडणी विरोधी पथक, गुन्हेशाखा, पिंपरी चिंचवड यांना कळविले.

वपोनि संतोष पाटील यांनी खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांची टिम तयार करुन, सदर इसमांचा शोध घेत असतांना, पोलीस अंमलदार गणेश गिरीगोसावी, निशांत काळे व रमेश गायकवाड यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, फोटो मधील इसम हा त्यांचे साथीदारासह साखरेवस्ती, हिंजवडी येथील पडक्या रो-हाऊसमध्ये बसेलेले असून, ते घातक शस्त्रासह दरोडा घालण्याची तयारी करत आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने, खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे सदर ठिकाणी जावून, छापा घातला. छाप्यामध्ये १) विष्णू दिगंबर पवार वय- २० वर्षे रा. मातोश्री हॉस्पीटल मागे, वडगाव मावळ, ता. मावळ, जि.पुणे २) करण राहूल लोखंडे वय-१८ वर्षे रा. मजीदजवळ, काळाखडक, वाकड, पुणे ३)  एका अल्पवयीन साथीदारासह मिळून आले. त्यांचे ताब्यातून ०२ लोखंडी कोयते, ०१ पालघन व मिरची पुड व दोरी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच ऋषिकेश जाधव व बाबू शेख रा. काळाखडक, वाकड, पुणे हे पोलीस आल्याची चाहूल लागल्याने पळून गेले. त्यांचेविरुध्द हिंजवडी पोस्टे गुरनं. ८८९/२०२४ भान्यसं ३१० (४) आर्म अॅक्ट ४ (२५) म.पो. अधि.क ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्यांचेकडे अधिक तपास करता, त्यांनी हिंजवडी पोस्टे गुरनं. ८९०/२०२४ भान्यसं ११०,१२७ (२),१३१,१८९(२),१८९ (४),१९१(३), १९०,११५ (२),३२४ (२),३५१ (२), ३५२ क्रि. अॅ. अॅक्ट क ७, आर्म अॅक्ट ४ (२५), म.पो. अॅक्ट ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे दाखल गुन्हा केल्याचे उघडकीस आला.

आरोपीतांवर जबरी चोरी, गंभीर दुखापत करणे, अवैध शस्त्र बाळगणे, मारहाण करणे चोरी असे ०७ गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई मा. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. शशिकांत महावरकर पोलीस सह-आयुक्त, मा.वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, मा. संदिप डोईफोडे, पोलीस उप- आयुक्त, गुन्हे, डॉ विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे, यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोउनी सुनिल भदाणे, पोलीस अंमलदार रमेश गायकवाड, निशांत काळे किरण काटकर, गणेश गिरीगोसावी व प्रदीप गायकवाड यांचे पथकाने केली आहे.

Comment As:

Comment (0)