Pune : Daksh Police Times
खुनाच्या व मोक्याच्या गुन्ह्यात पाहिजे असलेले मुख्य आरोपी व टोळी प्रमुख गुन्हे शाखा युनिट ४, पिंपरी चिंचवड कडुन अटक
- By पुणे प्रतिनिधी --
- Thursday, 18 Jul, 2024 --
- View : 473
दिनांक- ०१/०५/२०२४ रोजी सायंकाळी वाकड पोलीस ठाणे हद्दिमध्ये औंध-रावेत बी.आर.टी रोड मध्ये काही इसमांनी बाईक वरुन येवुन एका इसमावर कोयत्याने वार करुन त्याचा खुन केले बाबत वाकड पोलीस ठाणे, गु.र. नंबर-५५४/२०२४ भा.दं. वि. कलम ३०२,१२० (ब),३४१,१४३,१४५,१४७, १४८,१४९, आर्म अॅक्ट ४(२५), (२७) म.पो.का. कलम-३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हा दाखल झाल्या नंतर सदर गुन्हा करणारे काही आरोपींना यापुर्वी सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. परंतु सदर गुन्हा करणारे आरोपी व त्यांना मदत करणारे आरोपी हे संघटित गुन्हे करणारे असल्याने व सदर गुन्हयाचे केलेल्या तपासातुन सदर गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोका) कलम-३, ७ हे कलम वाढवण्यात आले होते. परंतु सदर गुन्हा दाखल झाले पासुन सदर गुन्हयातील मुख्य आरोपी व टोळी प्रमुख गणेश ढमाले आणि अभिजित ढमाले हे दोघे सख्ये भाऊ दोन-
अडीच महिन्यापासुन फरार होते. तेव्हा मा. पोलीस आयुक्त सो, पिंपरी चिंचवड, श्री. विनयकुमार चौबे यांनी सदर गुन्हयातील पाहिजे मुख्य आरोपींचा शोध घेवुन त्यांना अटक करणे बाबत आदेश दिले होते.
त्यानुसार आमचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-४, पिंपरी चिंचवड चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संदिप सावंत, पोलीस उपनिरीक्षक नारायण जाधव, पोहवा/९१६ तुषार शेटे, पोहवा/११८६ मोहम्मद गौस नदाफ, पोना/१७९२ सुनिल गुट्टे, पोशि/२१०२ प्रशांत सैद, पोशि/२२९३ धनाजी शिंदे, पोशि/२७२० सुखदेव गावंडे, पोशि/१८७२ गोविंद चव्हाण असे सदर गुन्हयातील पाहिजे आरोपींची माहिती काढुन शोध घेत असताना पोशि/प्रशांत सैद यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणा व्दारे व पोहवा/मोहम्मद गौस नदाफ व पोशि/२२९३ धनाजी शिंदे यांना मिळालेल्या बातमीवरुन वरील पथकाने दि. १७/०७/२०२४ रोजी सदर गुन्हयातील मुख्य आरोपी व टोळी प्रमुख नामे गणेश बाजीराव ढमाले, वय ३६ वर्षे, रा-जुनी सांगवी, पुणे यास तळेगाव दाभाडे परिसरातुन शिताफीने ताब्यात घेतले व अभिजित ऊर्फ ओंकार बाजीराव ढमाले वय-२९ वर्षे, रा-जुनी सांगवी, पुणे यास आळंदी परिसरातुन शिताफीने ताब्यात घेवुन त्यांचे कडे गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने योग्य ती चौकशी करुन त्यांची वैदकिय तपासणी करुन त्यांना सदर गुन्हयाचे तपासकामी सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे, वाकड विभाग यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त, विशाल हिरे, वाकड विभाग हे करत आहेत.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त मा. श्री. विनयकुमार चौबे सो, अपर पोलीस आयुक्त मा. श्री. वसंत परदेशी साो, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, संदिप डोईफोडे, सपोआ, गुन्हे मा. श्री. विशाल हिरे, सपोआ बाळासाहेब कोपनर यांचे मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा, युनिट-४, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप सावंत, पोउपनि आबासाहेब किरनाळे, नारायण जाधव, सहा.पो.उप.नि. संजय गवारे, अदिनाथ मिसाळ, पोहवा / प्रविण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, सुरेश जायभाये, रोहिदास आडे, पोना / वासुदेव मुंडे, सुनिल गुट्टे, पोशि / प्रशांत सैद, धनाजी शिंदे, गोविंद चव्हाण, सुखदेव गावंडे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोहवा/नागेश माळी, पोशि/पोपट हुलगे यांनी केली आहे.