No icon

Pune : Daksh Police Times

खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखेची दमदार कामगिरी

स्क्रैप व्यवसायीकाचे अपहरण करुन खंडणी वसुल करणाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करुन, ०२ आरोपीतांना ८,२७,०००/- रुपयाच्या मुद्देमालासह अटक

मा. पोलीस आयुक्त, पिपरी चिंचवड यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात छोटे मोठे व्यावसायीक, कंपनी तसेच जनतेकडून कोणत्याही प्रकारे जबरदस्तीकरुन, त्यांचेकडून हप्ता वसुली, खंडणी गोळा करणाऱ्या इसमाबाबतची माहिती निर्भिडपणे देण्याकरीता पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात खंडणी विरोवी पथकामार्फत नागरीकांना निर्भीडपणे तक्रार द्यावी याबाबत जाहीर आवाहन करण्यात आले आहे. त्याअनुषगाने खंडणी विरोधी पथकामार्फत आयुक्तालयाचे हदीत माहिती घेत असतांना, स्क्रैप व्यावसायीकाने खंडणी विरोधी पथक कार्यालयात समक्ष हजर राहुन कळविले की, दिनांक १२/०७/२०२४ रोजी सायंकाळी ०७/३० वा.चे सुमारास मोशी येथील वॉशिंग सेंटरवरुन बाळा बांगर,

प्रविण भालेराव व अशोक नावाच्या व्यक्तीने एका काळया रंगाचे कारमध्ये बळजबरीने बसवून, डांबुन ठेवुन, पुण्यात स्क्रैप व्यवसाय करावयाचा असल्यास महिन्याला साडेतीन लाख रुपये द्यावे लागतील अशी कोयत्याचा धाक दाखवून धमकी देवुन, दिड लाख रुपये घेवुन सोडुन दिले. त्यानंतर दिनांक १३/०७/२०२४ रोजी पुन्हा दिड लाख रुपये घेतले असून आणखीन पन्नास हजार रुपयाची खंडणी मागत आहेत अशी तक्रार दिल्याने त्याबाचत वपोनि सतोष पाटील यांनी तात्काळ दखल घेवुन, सदर प्रकार वरिष्ठांना कळविला असता, वरिष्ठानी सदरबाबत दिलेला आदेश व सुचना प्रमाणे, व्यवसायीकाने दिलेली तक्रार घेवुन, त्याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं ३६४/२०२४ भा.न्या.सं कलम १४० (२).१४२, ३०८ (३),३०८ (४),३०८ (५),११५(२), ३५२,३५१(२) महा. पो. अधि. कलम ३७ (१) (अ),१३५ अन्वये गुन्हा दाखल करुन, त्याअनुषंगाने खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार याचेसह आरोपीबाबत माहिती काढुन शोध घेत असताना वपोनि संतोष पाटील याना आरोपी हे मोशी प्रदर्शन केंद्राचे मागील बाजुस, आरटीओ लिंकरोड, बोन्हाडेवाडी, मोशी, पुणे येथे असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने, सदर ठिकाणी जावुन सापळा लावुन, आरोपी नामे १) बाळासाहेब बळीराम बांगर वय २७ वर्ष रा. शिक्षक कॉलनी, मेदनकरवाडी.. चाकण पुणे २) प्रवीण दत्तात्रय भालेराव वय २९ वर्ष रा. जयभवानीनगर, कोथरुड पुणे यांना १ लाख ६५ हजार रुपये रोख रक्कम, ०३ मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेली कार असे एकुण ८ लाख २७ हजार रुपयाचे मुद्देमालासह ताब्यात घेवुन, पुढील कार्यवाहीकामी एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी बाळासाहेब बळीराम बांगर व प्रवीण दत्तात्रय भालेराव हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यांचे

विरुध्द खंडणीसाठी अपहरण, खून, जबरी चोरी, बेकायदेशीर अग्निशस्त्रे बाळगणे, गंभीर दुखापत करणे व चोरी असे गंभीर गुन्हे दाखल असुन बाळासाहेब बांगर यास तडीपार करण्यात आलेले आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणीही व्यक्ती धमकी, दमदाटी व इतर कोणत्याही कारणाने हप्ता व खंडणीची मागणी करत असल्यास निर्भिडपणे खंडणी विरोधी पथकास मोवाईल नंबर 7517751793/

indgrevcell-pcpc@mah.gov.in/piaec.pepe-mh@mahapolice.gov.in यावर संपर्क करावा. सदरची कारवाई मा.विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरीचिंचवड, मा.वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्ा, मा. सदिम डोईफोडे, पोलीस उप आयुका, गुन्हे, डॉ विशाल हिरे, सहा. पोलीस आयुका, गुन्हे, यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोउनी सुनिल भदाणे, सपोफौ अमर राऊत, पोहवा सुनिल कानगुडे, किरण काटकर, प्रदिप गोडांबे, चंद्रकात जाधव, विजय नलगे, पोअंग प्रदिप गायकवाड, प्रदिप गुट्टे याचे पथकाने केली आहे.

Comment As:

Comment (0)