Pune : Daksh Police Times
शेअर ट्रेडींगचे नावाखाली ऑनलाईन फ्रॉड पिंपरी चिंचवड सायबर कडुन गुन्हा उघड
- By पुणे प्रतिनिधी --
- Friday, 12 Jul, 2024 --
- View : 197
शेअर ट्रेडींगचे नावाखाली १८,१२,४३५/- रुपयांचा ऑनलाईन फ्रॉड करुन त्या रक्कमेतुन युएसडीटी डॉलर खरेदी करणारे तीन आरोपींना पिंपरी चिंचवड सायबर कडुन ताब्यात घेऊन गुन्हा उघड
सांगवी पोलीस ठाणे हद्दीतील एका महीलेने फेसबुकवर शेअर ट्रेडींगबाबत आलेल्या जाहीरातीमधील लिंक ओपन केली असता सदर महीलेस एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले व त्यानंतर तिला त्यांचे बनावट ट्रेडींग प्लॅटफॉर्मवर पैसे गुंतवणुक केल्यास २५ ते ३० टक्के प्रॉफिट मिळवुन देण्याचे अमिष दाखवुन वेगवेगळ्या बैंकेच्या अकाऊंटला एकुण १८,१२.४३६/- रु. भरण्यास भाग पाडले तसेच त्या रक्कमेतुन युएसडीटी डॉलर घेवुन सदर महीलेस तिने गुंतवणुक केलेली रक्कम परत न देता सदर रक्कमेचा अपहार करुन आर्थिक फसवणुक केल्याबाबत सदर महीलेने दिलेल्या तक्रारीवरुन नमुद व्हॉट्सअपधारक व बैंक अकाऊटधारक यांचेविरुध्द सांगवी पोलीस स्टेशन येथे गुरनं. २९३/२०२४ भादवी कलम ४१९, ४२०, ३४ माहिती तंत्रज्ञान कायदा २००० कलम ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल आहे.
ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हयामध्ये वाढ होत असल्याने मा. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांचे अशा प्रकारचे गुन्हयांना प्रतिबंध व्हावा यादृष्टीने सायबर सेलमार्फत समांतर तपास करणेबाबत आदेश असल्याने सदर गुन्हयाचा समांतर तांत्रिक तपास सायबर सेल, गुन्हे शाखेचे सपोनि. प्रविण स्वामी व सायबर सेलचे पथक करीत होते. त्याप्रमाणे आरोपी यांनी गुन्हयासाठी वापरलेले बैंक अकाऊंटची माहीती घेत असताना असे निदर्शनात आले की, अश्वीन शेट्टी नावाचा इसमाने फसवणुकीचे रक्कमेतुन युएसडीटी ही क्रिप्टोकरन्सी विकत घेतली आहे. त्याअनुषंगाने तांत्रिक तपास करता तो इसम मुंबई येथे असल्याची माहीती प्राप्त झाल्याने सपोनि, प्रविण स्वामी यांनी वरीष्ठांकडुन मुंबई येथे जावुन तपास करण्याची परवानगी प्राप्त करुन दि. ९/०७/२०२४ रोजी पोउपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे व सायबर सेल कडील अंमलदार अतुल लोखंडे, सौरभ घाटे, श्रीकांत कबुले यांचे पथक तांत्रिक माहीतीचे आधारे मुंबई येथे रवाना करुन स्थानिक पोलीसांच्या मदतीने संशयीताचा शोध घेवुन १) अश्वीन शेट्टी ऊर्फ अश्वीन नारायण शेरगर रा. ४०१, भारती पार्क, मिराभाईंदर मिरारोड पुर्व ता. जि. ठाणे. २) विरेंद्र राजेंद्रप्रसाद राय वय ३२ वर्षे, धंदा नोकरी, रा. ३०४, नवलता कुंज, नवघर रोड, भाईंदर पूर्व ता.जि. ठाणे. ३) नसीर अब्दुल सय्यद वय ३६ वर्षे, रा. बी/५०५ क्लस्टर ०१ शांतीपार्क बालाजी हॉटेल समोर मिरारोड ईस्ट ता.जि. ठाणे यांना ताब्यात घेवुन सायबर सेल येथे आणले. त्यानंतर त्यांचेकडे गुन्हयाबाबत कौशल्यपुर्वक तपास करता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे साथीदार नामे सलमान व अभि रा. दुबई यांच्यासह संगणमताने करीत असल्याची कबुली दिली आहे. तिघांचाही गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना त्यांचेकडे मिळुन आलेले रोख रक्कम ४ लाख रुपये, ७ मोबाईलसह सांगवी पोलीस ठाणे यांचेकडे दाखल गुन्हयाचे कारवाईकामी ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. संदिप डोईफोडे, पोलीस उपआयुक्त, गुन्हे, पिंपरी चिंचवड, मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप आयुक्त, परि-१, व अति. कार्यभार पोलीस उप आयुकत गुन्हे, पिंपरी चिंचवड, मा.विशाल हिरे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे, अतुल लोखंडे, नितेश बिचेवार, सौरभ घाटे, श्रीकांत कबुले, दिपक भोसले, सचिन घाडगे, अभिजीत उकिरडे, अशोक जवरे (सर्व नेमणुक सायबर सेल) यांच्या पथकाने केली आहे.