No icon

कोथरुड : दक्ष पोलिस टाइम्स

कोथरुड परिसरातील सराईत गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध, पोलीस आयुक्तांची 87 वी कारवाई

कोथरुड परिसरात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारावर पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत (Pune Police MPDA Action) स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे. सिद्धांत उर्फ सिद्धार्थ उर्फ सिध्या संजय मराठे (वय-24 रा. प्रतिकनगर, जय भवानीनगर, कोथरुड) असे स्थानबद्ध केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस आयुक्तांनी आजपर्यंत 87 सराईत गुन्हेगारांवर स्थानबद्धेची कारवाई केली आहे.

 

आरोपीने कोथरुड पोलीस ठाण्याच्या (Kothrud Police Station) हद्दीत कोयते, चाकु, तलवार, रॉड या सारख्या घातक हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जाळपोळ, दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यविरुद्ध पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे या परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.

आरोपी सिद्धांत मराठे याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सिद्धांत मराठे याला एमपीडीए कायद्यांतर्गत नागपूर मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

ही कारवाई कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व गुन्हे शाखा, पी.सी.बी. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे, पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली.

Comment As:

Comment (0)