पिंपरी : दक्ष पोलिस टाइम्स
पिंपरी-चिंचवडमध्ये कोयता गँगची दहशत
- By पुणे प्रतिनिधी --
- Wednesday, 10 Jan, 2024 --
- View : 146
शहरातील कोयता गँगची दहशत काही केल्या संपत नसल्याचे दिसून येत आहे. नवीन वर्षाच्या आठ दिवसात कोयत्याने हल्ला करणे, दहशत पसरविणे, कोयता बाळगणे असे पाच गुन्हे दाखल झाले आहेत.
पिंपरी : शहरातील कोयता गँगची दहशत काही केल्या संपत नसल्याचे दिसून येत आहे. नवीन वर्षाच्या आठ दिवसात कोयत्याने हल्ला करणे, दहशत पसरविणे, कोयता बाळगणे असे पाच गुन्हे दाखल झाले आहेत. भोसरीतील वर्दळीच्या राजमाता जिजाऊ उड्डाणपूलाखाली सोमवारी दारु पिण्यासाठी पैशांची मागणी करत तीन जणांनी कोयत्याचा धाक दाखवत तरुणाला मारहाण करत लुटले. हातातील कोयते हवेत भिरकावत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली.
निलेश फकिरा काळे (वय ३१, रा. दिघी, मुळ – लोहारा, जळगाव) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुनिल जनार्धन सकट (वय ३२), दिपक रामकिशन हजारे (वय २७, दोघे रा. लांडेवाडी, भोसरी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांचा साथीदार पवन छगन उजगरे (रा. भोसरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.