No icon

पुणे: दक्ष पोलिस टाइम्स

कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणाची पुणे पोलिसांनी दिली सविस्तर माहिती

शरद हिरामण मोहोळ याच्यावर गोळ्या झाडून खून करण्यात आला. शरद मोहोळ सुतारदार येथून त्याच्या घरी जात असताना त्याच्या सोबतच असलेला साथीदार मुन्ना उर्फ साहील पोळेकर याने त्याच्या इतर साथीदारांसह मोहोळवर गोळ्या झाडल्या. या गुन्ह्यातील आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने आठ तासात अटक केली आहे.

आरोपींकडून तीन गावठी पिस्टल, तीन मॅगझीन, पाच जिवंत काडतुसे, 8 मोबाईल, महिंद्रा एक्सयुव्ही, स्वीफ्ट गाडी, रोख रक्कम असा एकूण 22 लाख 39 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. साहील उर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महीपती कानगुडे, अमित उर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहु शेळके, विनायक संतोष गाव्हणकर, विठ्ठल किसन गांदले, अ‍ॅड. रविंद्र वसंतराव पवार, अ‍ॅड. संजय रामभाऊ उडान यांच्यावर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

खंडणी विरोधी पथक दोनचे अधिकारी यांना मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गुन्हा केल्यानंतर चारचाकी गाडीतून पळून गेल्याचे समजले. पथकाने सीसीटीव्ही विश्लेषणातून आरोपी मुंबई-बेंगलोर हायवे रोडने सातारा रोडच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपींच्या चारचाकी गाडीचा नंबरचा मिळवला. दरम्यान, गुन्ह्यातील आरोपी खेड शिवापुर टोलनाका पास करुन पुढे जात असल्याची माहिती मिळाली. DCP अमोल झेंडे यांनी खंडणी विरोधी पथक एक व गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकांना आरोपींच्या शोधासाठी साताऱ्याच्या दिशेने रवाना केले. आरोपींचा शोध घेत असताना पुणे सातारा रोडवर किकवी जवळ संशयित स्वीफ्ट गाडी गाडीचा किमी पाठलाग करुन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

ही कामगिरी CP रितेश कुमार, Jt CP रामनाथ पोकळे, DCP अमोल झेंडे, ACP सुनिल तांबे, ACP सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली PI प्रताप मानकर, अजय वाघमारे, शब्बीर सय्यद, श्रीहरी बहीरट, महेश बोलकोटगी, सोमनाथ जाधव, उल्हास कदम, सुनिल थोपटे, क्रांतीकुमार पाटील, API अभिजीत पाटील, PSI मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण, राहुल पवार, राजेंद्र पाटोळे, पोलीस अंमलदार चेतन शिरोळकर, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, अमोल पिलाणे, अमोल आव्हाड, राजेंद्र लांडगे, रविंद्र फुलपगारे, दुर्योधन गुरव, सयाजी चव्हाण, विजय कांबळे, प्रविण ढमाल, राहुल मखरे, अनिकेत बाबर, अभिनव लडकत, शशिकांत दरेकर, ज्ञानेश्वर चित्ते, सुमित ताकपेरे, श्रीकांत दगडे, साई कारके, ऋषिकेश ताकवणे, नितीन मुंडे यांच्या पथकाने केली.

Comment As:

Comment (0)