No icon

भडगाव प्रतिनिधी

प्रांत अधिकारी पाचोरा यांना जात प्रमाणपत्रसाठी कोळी समाजाचे निवेदन 


भडगाव - भडगाव आदिवासी कोळी समाजाच्या वतीने प्रांत कार्यालय पाचोरा यांना जात प्रमाणपत्र सुलभ रित्या मिळाले पाहिजे यासाठी भडगाव तालुका आदि वासी कोळी समितीने आज शासकीय विश्राम गृह पाचोरा येथे समाजाच्या सामान्य कार्य कर्त्यांची पाचोरा भडगाव एकत्रित बैठकीचे आयोजन करण्यात आले यावेळी समाजातील जात प्रमाणपत्र काढायला कोणत्या कागदपत्रे आवश्यक असतात तसेच प्रमाण पत्र काढण्यासाठी कोणत्या समस्या येतात. शाळा इ- सुविधा केंद्रात मोठया प्रमाणात पैसे शासकीय नियम पेक्षा जास्तीचे घेतले जातात,अधिकारनसताना 1950  पूर्वीचे कागदपत्रे मागितली जातात काही वेळा जात प्रकरणे स्वीकारण्यासाठी आर्थिक मागणी करण्यात येते अश्या असंख्य समस्या समजून घेउन त्याप्रमाणे निवेदन तयार कर ण्यात आले व ते प्रांत साहेब भूषण अहिरे यांची भेट घेऊन निवेदन तसेच जात प्रमाणपत्र बाबत समस्या समाजा तर्फे मांडण्यात आले यावेळी प्रांत साहेबानी सकारात्मक मार्गदर्शन केले यावेळी मोठया प्रमाणात आदिवासी कोळी समाज बांधव उपस्थित होते आदिवासी कोळी समाज संघटनाचे जिल्हा सदस्य संभाजी शेवरे,भडगाव आदिवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल सावळे,सुनील मोरे, प्रा. सुरेश कोळी भिवसन निकम रामदास कोळी दशरथ जाधव, विजय बागुल, दगडू कोळी, प्रवीण कोळी, जिभाऊ कोळी,सुनील मोरे संजय काकडे,संजय कोळी भगवान कोळी,अनिल निकम, अजय मोरे,समाधान कोळी, धर्मेंद्र कोळी राजेंद्र खैरनार रामदास कोळी व यावेळी भडगाव तालुक्यातील आदिवासी कोळी समाज कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते तसेच सर्व कार्यकर्ते पाचोरा प्रांत कार्यालयात ही निवेदन देण्यासाठी उपस्थित होते

Comment As:

Comment (0)