Daksh Police Times
Daksh police times आळंदी पोलीस स्टेशन कडून जबरी चोरीचा गुन्हा 24 तासात उघड करून महिला आरोपी व सर्व मुद्देमाल जप्त केल्या बाबत…..
Saturday, 16 Nov 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

 

       फिर्यादी यांनी फिर्याद दिली की दिनांक 14/ 11/ 2024 रोजी सकाळी 08/45 वाजताच्या सुमारास अनोळखी इसम याने चोरी करण्याचे उद्देशाने त्यांचे राहते घरी ज्ञानेश्वर पार्क मरकळ रोड येथे प्रवेश करून फिर्यादीच्या तोंडावर, डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकून त्यांचे तोंडावर पंच मारून फिर्यादीचा दात पाडून त्यांना दुखापत केली आहे तसेच त्यांना मारहाण करून राहते घराच्या बाथरूम मध्ये कोंडून फिर्यादीच्या घरातील एक डेल कंपनीचा लॅपटॉप व विवो कंपनीचा मोबाईल फोन चोरून घेऊन गेला आहे सदर अनोळखी इसमाचे वर्णन अंगात निळ्या रंगाचा टी-शर्ट काळे रंगाची पॅन्ट वय अंदाजे 18 ते 20 वर्षे बांदा सडपातळ वगैरे मजकूर वरून आळंदी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क्र 367/ 2024 बीएनएस कलम 309(6), 311,331(3) , 331(5) प्रमाणे नोंद केला आहे.

 

 *सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने सदर घटनास्थळी माननीय पोलीस उप आयुक्त डॉ शिवाजी पवार सो,परिमंडळ 3, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंग गौर चाकण विभाग सो , वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बी एस नरके सो आळंदी पोलीस स्टेशन तसेच तपास पथकाचे अधिकारी PSI राहुल दूधमल व पोलीस स्टाफ असे हजर राहून सदर ठिकाणची पाहणी करून आरोपीचा व चोरीस गेले मालाचा शोध घेणे कामे सदर ठिकाणचे आजूबाजूस पाहणी केली असता घटनाष्टलावरून काही संशयित वस्तू मिळून आल्या. त्यानंतर लागलीच इन्वेस्टीगेशन कार व फिंगरप्रिंट तज्ञ् यांना घटनास्थळी बोलावून तपासणी करून ब्लड सॅम्पल व इतर सॅम्पल कलेक्टर केली.तसेच आजूबाजूचे परिसरातील CCTV फुटेज तपासले तसेच आजूबाजूस लोकांकडे चौकशी करून माहिती घेऊन फिर्यादी यांचे बिल्डिंग मधे राहणारे महिला नामे सौ पूजा मुडे यांना चौकशीकामी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांचा सदर गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने तात्काळ सदरची माहिती मा वरिष्ठना दिली. त्यानंतर सदर महिलेची वैद्यकीय तपासणी करून मा सर्वोच्च न्यायलायचे मार्गदर्शक तत्वाचे तंतोतंत पालन करून नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदर महिला आरोपीने निवेदन दिल्याप्रमाणे त्यांचे राहते घरातील किचन मध्ये एका ज्वारी च्या गोणीत लॅपटॉप, मोबाईल,चाकू तसेच सदर आरोपीने गुन्हा करतेवेळी अंगात घातलेले कपडे काढून दिल्याने सदर मुद्देमाल दोन पंचा समक्ष जप्त करण्यात आला आहे*

      सदर घटनास्थळावर शांतता असून कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नाही. जखमी च्या जिवाला कोणताही धोका नाही.

 तपास अधिकारी:- पोलीस उपनिरीक्षक राहुल दुधमल आळंदी पोलीस स्टेशन