चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील मोरेवस्ती, साने चौक, टॉवरलाईन, कुदळवाडी, चिखली हा मोठ्या लोकसंख्येचा व दाट लोकवस्तीचा भाग आहे. सदर भागामध्ये रात्रीचेवेळी मोटारसायकल पार्क करण्यासाठी पार्किंग उपलब्ध नसल्याने नागरिक त्यांच्या मोटारसायकली राहते घराच्या समोरील रस्त्याचे कडेला पार्क करीत असतात. मागील काही दिवसांपासून चिखली पोलीस ठाणे हद्दीतुन मोटारसायकल चोरीच्या गुन्हयांमध्ये वाढ झाली. त्यामध्ये विशेषतः युनिकॉर्न मोटारसायकल चोरीस जाण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसुन आल्याने युनिकॉर्न मोटारसायकल चोरणा-या चोरटयास पकडणे हे चिखली पोलीसांसमोरील एक आव्हान होते. मा.श्री. विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत श्री. विठ्ठल साळुंखे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक चिखली पोलीस स्टेशन यांना सुचना दिल्या. त्याप्रमाणे श्री. विठ्ठल साळुंखे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक चिखली पोलीस स्टेशन यांनी चिखली पोलीस स्टेशनचे डी. बी. पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनि/राम गोमारे व पोलीस अंमलदार यांची मिटींग घेवुन मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे अनुषंगाने सुचना देवुन मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे सपोनि/गोमारे व तपास पथकातील अंमलदार यांनी मागील सलग दहा दिवस शरदनगर, मोरेवस्ती, त्रिवेणीनगर त्याप्रमाणे सपोनि/गोमारे व तपास पथकातील अंमलदार यांनी मागील सलग दहा दिवस शरदनगर, मोरेवस्ती, त्रिवेणीनगर या भागामध्ये आरोपीला पकडण्यासाठी ट्रॅप लावले होते परंतु सदर चोरटा पोलीसांचे हाती लागत नव्हता. दिनांक २४/१०/२०२४ रोजी सपोनि/गोमारे व तपास पथकातील अंमलदार हे मोरेवस्ती भागामध्ये पेट्रोलिंग करीत असताना एक इसम यूनिकॉर्न गाडीवरुन आंगणवाडी चौकाकडुन शिवरकर चौकाकडे जात असताना त्याचा संशय आल्याने पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव महादेव शिवाजी गरड वय २६ वर्षे, राह. हरिओम हौसिंग सोसायटी, गल्ली नंबर १, शिवरकर चौकाजवळ, ताम्हाणेवस्ती चिखली, पुणे मुळ राह. विठ्ठल मंदीराजवळ, अंबुलगा घरणी, ता. चाकुर, जि. लातुर असे असल्याचे सांगितले. तेव्हा त्याची अंगझडती घेतली असता त्याचे खिशात मोटारसायकलच्या पाच चाव्यांचा जुडगा, त्या सर्व चाव्यांवर HONDA असे इंग्रजीमध्ये लिहीलेले व युनिकॉर्न चे चिन्ह असलेल्या चाव्या मिळुन आल्या. तेव्हा चिखली पोलीस स्टेशन हद्दीतुन युनिकॉर्न मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा हाच चोरटा असल्याचे तपास पथकाच्या लक्षात आले. त्यास त्याचे ताब्यात मिळून आलेल्या युनिकॉर्न मोटारसायकल नंबर एम.एच.१४.एच.व्ही.८३५४ बाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवु असता त्यास पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हयाची कबुली दिली. सदरचे गाडी ही चिखली पोलीस स्टेशन, गुन्हा रजि. नंबर ६२८/२०२४, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) या गुन्हयातील चोरीस गेलेली युनिकॉर्न असल्याची खात्री झाली. आरोपीत यास अटक करुन विश्वासात घेवुन त्याचेकडे कौशल्यपुर्वक तपास केला असता त्याने अशी माहीती दिली की, त्याचे कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण झालेले असून त्याने मागील एक वर्षाच्या कालावधीमध्ये मोरेवस्ती, शरदनगर, त्रिवेणीनगर, चिखली या परिसरातुन ब-याच यूनिकॉर्न मोटारसायकलींच्या चो-या केलेल्या आहेत. त्याचेजवळ पाच युनिकॉर्न गाडयांच्या डुप्लीकेट चाव्या असुन त्याचा वापर करुन तो गाडयांची चोरी करतो. तो साधारणपणे पहाटे ०४.३० ते ०७.०० वाजताचे दरम्यान यूनिकॉर्न मोटारसायकलींची चोरी करतो. तो चोरी करण्यासाठी येताना पहाटेच्यावेळी मॉर्निंग वॉक करणा-या नागरिकांना संशय येवु नये या करीता अंगामध्ये ट्रॅक पँन्ट, हाफ टीशर्ट, हातामध्ये नॅपकिन, स्पोर्ट शुज अशी कपडे घालुन येतो त्यामुळे रस्त्याने येणा-या जाणा-या लोकांना तो वॉकिंग करीत आहे असे वाटते. तो त्याचेजवळील मोटारसायकलवरुन फिरुन यूनिकॉर्न गाडी कोठे पार्क केलेली आहे. जी सहज चोरुन नेता येईल अशी गाडी निवडतो. त्यानंतर त्याची मोटारसायकल काही अंतरावर पार्क करुन तेथुन चोरी करण्यासाठी निवडलेल्या यूनिकॉर्न मोटारसायकलजवळ जावून त्याचेजवळील चाव्यांमधून जी चावी गाडीला लागेल त्या चावीने गाडी चालू करुन निवडलेल्या युनिकॉर्न मोटारसायकलजवळ जावुन त्याचेजवळील चाव्यांमधुन जी चावी गाडीला लागेल त्या चावीने गाडी चालु करुन चोरुन घेवुन जातो. त्याने चोरी केलेल्या गाड्या विकण्याकरीता अजय जाधव या नावाने त्याने फेसबुक मार्केट प्लेस यामध्ये त्याचे अकाउंट काढले असुन चोरी केलेल्या यूनिकॉर्नचा फोटो तो फेसबुक मार्केटप्लेस या अॅपमध्ये टाकुन त्याची किंमत तो ३० ते ३५ हजार रुपये असल्याचे टाकतो. त्यानंतर सामान्य नागरिक त्याचे प्रलोभणाला बळी पडुन त्याचेकडुन गाडया खरेदी करतात. त्याला गाडी विकत घेणा-या लोकांनी गाडीच्या कागदपत्राबाबत विचारपुस केली तर तो त्यांना गाडीचे कागदपत्र फायनान्स कंपनीकडे आहेत तुम्हाला नंतर कागदपत्रे देतो असे सांगुन तो सदरची गाडी २५ हजार ते ३० हजार रुपयांना विकत असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे. आरोपीत याचेकडुन आतापर्यंत त्याने चोरी केलेल्या एकुण ७ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या एकुण १६ युनिकॉर्न मोटारसायकली जप्त केल्या असुन त्याबाबत एकुण १६ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. आरोपी हा सध्या पोलीस कस्टडीमध्ये असुन सदर गुन्हयाचा तपास पोहवा/१२४५ व्होनमाने चिखली पोलीस स्टेशन हे करीत आहेत. सदरची कामगिरी मा.श्री. विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा.डॉ. शशिकांत महावरकर, सह पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा.श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड मा.डॉ. शिवाजी पवार, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-३, मा.श्री. सचिन हिरे, सहा. पोलीस आयुक्त, भोसरी एम.आय.डी.सी. विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विठ्ठल साळुंखे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, चिखली पोलीस स्टेशन व श्री. अमोल फडतरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे अधिपत्याखाली, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनि/राम गोमारे, पोहवा/बाबा गर्जे, पोहवा / चेतन सावंत, पोहवा / भास्कर तारळकर, पोहवा/संतोष भालेराव, पोहवा/अमोल साकोरे, पोहवा/विनोद व्होनमाने, पोहवा/राजु जाधव, पोना/अमर कांबळे, पोना / कबीर पिंजारी, पोना/सुरज सुतार, पोशि / संतोष सकपाळ, पोशि/संतोष भोर, यांनी यशस्वी रित्या पार पाडली आहे. चिखली पोलीसांच्या या कारवाईमुळे समाजातील सर्व स्तरातुन पोलीसांचे कौतुक होत आहे.