Daksh Police Times
Pune : Daksh Police Times नार्कोर्टीक्सचे पोलीस अधिकारी असल्याचे व कुरीयरमध्ये ड्रग्ज मिळाल्याचे खोटे सांगुन त्यामध्ये अटकेची भिती घालुन एकुण १२ लाख रुपयांची फसवणुक करणारे सिकर, जोधपुर, राजस्थान येथील ०४ आरोपींना सायबर पोलीसांकडुन अटक
Thursday, 24 Oct 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

वाकड येथे राहणा-या फिर्यादी यांना आरोपींनी व्हॉट्सअॅप टेलिग्रामद्वारे व्हिडीओ कॉल करुन फेडेक्स कुरीयर मधुन बोलत असल्याचे सांगुन मुंबई कस्टम डिपार्टमेंटला तुमचे कुरीयरमध्ये १०० ग्रॅम ड्रग मिळुन आले असल्याचे सांगुन सदर पार्सलला तुमचे नांव व आधार नंबर लिंक आहे त्यासाठी तक्रार करण्यास मदतीचे बहाण्याने मुंबई नार्कोटिक्स डिपार्टमेंटमधुन मोठ्या हुद्याचे पोलीस अधिकारी बोलत असल्याचे भासवुन फिर्यादी यांना अटकेची भिती घालुन क्लियरन्स सर्टीफिकेटच्या नावाखाली विश्वास संपादन करुन फिर्यादी यांना वेगवेगळ्या बँक अकाऊंट एकुण १२,२२,१३३/-रुपये भरण्यास भाग पाडुन आर्थिक फसवणुक केली म्हणुन फिर्यादी यांनी संबंधिताविरुध्द तक्रार दिल्याने वाकड पोलीस ठाणे गु.र.नं. १०४१/२०२४ भा.न्या.सं. कलम- ३१८(४), ३१९(२), माहीती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (डी) प्रमाणे फिर्याद दाखल आहे. सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने मा. पोलीस आयुक्त, श्री. विनयकुमार चौबे यांनी अशा प्रकारचे गंभीर स्वरुपांचे गुन्हयांना प्रतिंबध होणेकामी सदर गुन्हयाचा सखोल तपास करुन गुन्हा उघडकीस आणुन आरोपी अटक करणेकामी सायबर सेल सध्या सायबर पोलीस ठाणे यांनी तपास करणेबाबत आदेशीत केले होते. त्याप्रमाणे मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री. संदीप डोईफोडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. डॉ. विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे हे गुन्हयाचा तपास करीत आहेत. त्यांनी गुन्हयाचे तपासकामी सपोनि. प्रविण स्वामी व पोउनि. सागर पोमण, विदया पाटील यांची पथके तयार करुन गुन्हयाचे तपासाबाबत मार्गदर्शन केले.

त्याप्रमाणे तपास करीत असताना आरोपी यांनी गुन्हयासाठी वापरलेले बँक अकाऊंटपैकी एक बँक अकाऊंट हे नाशिक येथील रिक्षा चालविणारे गरीब इसमाचे असल्याबाबत माहीती मिळाली त्या अनुषंगाने नाशिक येथे पथक पाठवुन तपास केला असता एका काळया रंगाचे स्कॉर्पिओ कारमधुन एक इसम येवुन अकाऊंट घेवुन जात असल्याची माहीती प्राप्त झाली त्यावरुन सखोल तपास करुन तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास चालु केला. त्यावरुन जोधपुर, राजस्थान येथील काही इसम पिसोळी, उंड्री भागात काही दिवसापासुन येवुन राहत असल्याबाबत तसेच त्यांचेकडे काळया रंगाची स्कॉर्पिओ कार असल्याबाबत माहीती मिळाल्याने त्या अनुषंगाने खात्रीपुर्वक माहीती काढुन नेमलेले पथकामार्फत एआरव्ही न्यु टाऊन सोसायटी, जगदंबा भवनजवळ, पिसोळी, पुणे येथे छापा टाकला असता सदर फ्लॅटमध्ये संशयीत आरोपी १) मोहम्मद इलियास मोहम्मद सदिक कलाल वय ३६ वर्षे, रा. वार्ड नं. १७, नगरपालिकाजवळ, लोसल, जि. सिकर, जयपुर राजस्थान २) मोहम्मद शाहिद अहमद अली वय २५ वर्षे रा. खेतन आडी मंडोर रोड, जोधपुर, राजस्थान, ३) पुरणसिंग रतन सिंग वय २४ वर्षे रा. किशोर बाग, मंडोर रोड, जोधपुर, राजस्थान. ४) नाजील खत्री मन्वरअली खत्री वय २९ वर्षे, रा. खेतन आडी मंडोर रोड, जोधपुर, राजस्थान हे वेगवेगळया कंपनीचे मोबाईल फोन१८ मोबाईलचे सिमकार्ड - ९०, लॅपटॉप- ०१, बँक पासबुक किट ६०, एटीएम/डेबिट कार्ड ६०, पासपोर्ट २, आधार कार्ड- १५, पॅन कार्ड-०३, ड्रायव्हींग लायसन्स ०३, रोख १७०० रुपये फॉर्च्यूनर कार नं आर.जे. १९ युई ०००७, स्कॉर्पिओ कार आर. जे. १९ युजी ७०७० असे एकुण ७२,१७,२००/- रु. चे मुद्देमालासह मिळुल आले.

त्यांचेकडे कौशल्यपुर्वक तपास केला असता त्यांचा गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासामध्ये आरोपी हे फसवणुकीचे रक्कमेतुन युएसडीटी मार्फत देशांतर्गत व परदेशात पैसे पाठवित असल्याची माहीती मिळुन आली आहे. त्या अनुशंगाने अधिक तपास करणे, त्याचेकडे गुन्हा करण्यासाठी वापरलेले बँक अकाउंट, त्यामधील व्यवहार, इतर साथीदार, त्यांचेकडे मिळुन आलेले मुद्देमालाबाबत, त्यांचा अशा प्रकारे किती गुन्हयामध्ये सहभाग आहे, इत्यादीबाबत तपास चालु आहे. सदरची कारवाई मा. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. डॉ. शशिकांत महावरकर - सह पोलीस आयुक्त, मा. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. संदिप डोईफोडे - पोलीस उपआयुक्त, गुन्हे, मा. डॉ. विशाल हिरे सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे १ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सपोनि. प्रविण स्वामी, पोउपनि. सागर पोमण, पोउनि. विदया पाटील, पोउनि. वैभव पाटील, पोउनि. प्रकाश कातकाडे पोलीस अंमलदार हेमंत खरात, दिपक भोसले, दिपक माने, अतुल लोखंडे, प्रितम भालेराव, अभिजीत उकिरडे, श्रीकांत कबुले, सौरभ घाटे, संदिप टेकाळे, निलेश देशमुख, सुरंजन चव्हाण, मुकुंद लोटके, प्रिया वसावे, दिपाली चव्हाण सर्व नेमणुक सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली आहे. नागरीकांना आवाहन अशा प्रकारे येणा-या फसव्या फोनला घाबरुन जाऊ नये, तसेच अनोळखी कॉलवर विश्वास न ठेवता नजीकच्या पोलीस ठाण्यात जाऊन खात्री करुन घ्यावी. पोलीस अशा प्रकारे कोणालाही फोन करत नाहीत अगर डिजीटल अरेस्टची भिती घालत नाहीत. कोणत्याही परिस्थितीत आपला मोबाईल स्क्रिन, बँक अकाऊंट, वैयक्तीक माहीती शेअर करु नये.