Daksh Police Times
Pune : Daksh Police Times मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही नाक्यांवर टोलमाफी, आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय
Sunday, 13 Oct 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

 विधानसभेची (Vidhan Sabha Election) आचारसंहिता कोणत्याही क्षणाला लागू शकते. उद्या निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन
राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता आहे.

मंत्रालयात हालचाली गतीमान झाल्या असून आज महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक ठरण्याची शक्यता आहे. या बैठकीत मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांची राज्य मंत्रिमंडळात मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी
करण्यात आला आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
कोणत्या पाच टोलनाक्यावर टोलमाफी?
आनंदनगर टोलनाका
दहिसर टोलनाका
मुलुंड-एलबीएस टोलनाका
वाशी टोलनाका
ऐरोली टोलनाका
टोलमाफीवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
गेली अनेक वर्ष आमचा हा लढा सुरु होता त्याला यश मिळालं आहे, उशिरा का होईना सरकारला सुबुद्धी मिळाली. हा निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता
कायम असावा नाहीतर निवडणुकीनंतर त्याचा बोजा जनतेवर माराल.

मंत्रिमंडळ बैठकीच्या संदर्भात मोठी गोपनीयता
महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक ठरण्याची शक्यता आहे. त्यासाठी आज मोठ्या प्रमाणावर निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले जाणार
आहे. मंत्रिमंडळ बैठकीच्या संदर्भात मोठी गोपनीयता ठेवण्यात आली आहे. मंत्रीमंडळ बैठकीचा अजेंडा मंत्र्यांना थेट बैठकीत दिला जाणार आहे.
बैठकीच्या आधी कोणत्याही मंत्र्यांना किंवा अधिका-यांना अजेंडा दिला गेला नाही. त्यामुळे आयत्यावेळी अनेक निर्णय होणार आहे.

मुंबईतील टोल माफीचा मोठा बोजा राज्याच्या तिजोरीवर
मुंबईतील टोल माफीचा मोठा बोजा राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. जवळपास पाच हजार कोटी रुपयांचा भार राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे.
मुंबईतील पाच टोलनाक्यावरील टोलमाफीचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारला जवळपास पाच हजार कोटी रुपये संबंधित कंत्राटदाराना द्यावा लागणार
आहे. पाच टोलपैकी चार टोलची मुदत 2027 पर्यंत आहे तर एक टोल 2029 पर्यंत आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या सर्व हलक्या वाहनांना टोल वसुली
मिळणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकारची मोठी लोकप्रिय घोषणा आहे.


हलकी वाहने म्हणजे काय?
साधारण कार, जीप, ट्रॅक्टर आदी वाहनांना हलकी वाहने म्हटले जाते. ज्या वाहनांचे सरासरी वजन 7500 किलोग्रॅमच्या वर नसते, असा वाहनांना हलकी
वाहने म्हटले जाते.


याआधी सरकारने कोणकोणते निर्णय घेतले?
राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकतो. त्याआधी राज्य सरकार महत्त्वाचे
निर्णय घेत आहे. याआधी महायुती सरकारने समाजातील वेगवेगळ्या घटकांना आकर्षित करण्यासाठी महायुती सरकारने अनेक लोकप्रिय निर्णय घेतले
आहेत. सरकारने राज्यातील होमगार्ड्सचे मानधन जवळपास दुप्पटे केले आहे. या निर्णयाचा जवळपास 50 हजार होमगार्ड्सना फायदा होणार आहे. यासह
सरकारने राज्यातील अनेक आयटीआय संस्थांची नावे बदलली आहेत. या संस्थांना महापुरुषांची नावे देण्यात आली आहेत. राज्य सरकारने राज्यातील
मदरशांत शिकविणाऱ्या शिकक्षांचे मानधनही दुप्पट केले आहे.