Daksh Police Times
Pune : Daksh Police Times मिक्सरची धडक बसून रस्ता ओलांडणार्‍या तरुणीचा मृत्यु ! कोथरुडमधील बसस्टँडसमोरील घटना
Tuesday, 08 Oct 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

थोडेसे लांब पडत असल्याने अनेक जण मोठ मोठ्या दुभाजकांवर चढून रस्ता ओलांडत असतात. मोठ्या दुभाजकावरुन रस्ता ओलांडणे एका तरुणीच्या जीवावर बेतले आहे. उंच असलेल्या दुभाजकावरुन रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करणार्‍या या तरुणीला वेगाने आलेल्या सिमेंट मिक्सरची धडक बसल्याने त्यात तिचा मृत्यु झाला. कोथरुड बसस्टँडसमोर आज सकाळी नऊ वाजता हा अपघात झाला.
आरती सुरेश मनवाने (वय २३, रा. एरंडे होस्टेल, भेलके नगर, कोथरुड) असे या तरुणीचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरती मनवाने ही मुळची अमरावतीची राहणारी आहे. कर्वे पुतळा पासून पुढे डहाणूकर कॉलनीपर्यंत कर्वे रोडवर मोठा उंच दुभाजक आहे. सुतार बसस्टँँड समोरुन या उंच दुभाजकावरुन रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न आरती ही करत होती.

त्याचवेळी डहाणुकर कॉलनीकडून (Dahanukar Colony Pune) कर्वे पुतळ्याच्या दिशेने एक सिमेंट मिक्सर वेगाने येत होता. त्याची धडक आरतीला बसली. त्यामुळे ती खाली पडून मिक्सरचे चाक तिच्या डोक्यावरुन गेले. त्यामुळे तिचा जागीच मृत्यु झाला. मिक्सर चालकाने काही अंतरावर मिक्सर थांबून तेथून पळ काढला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. अलंकार पोलीस (Alankar Police) अधिक तपास करीत आहेत.