राज्य पोलिस दलातील आयपीएस आणि राज्य पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश सोमवारी गृहविभागाने काढले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे फेरबदल करण्यात आले आहेत. मुंबईच्या उत्तर प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त राजीव जैन यांच्याकडे राज्य राखीव पोलिस बलाचे उप- महानिरीक्षक पदाची जबाबदारी दिली आहे. त्यांच्या जागी सशस्त्र पोलिस दलाचे अतिरिक्त आयुक्त अभिषेक त्रिमुखे यांची नियुक्ती केली.
बंदर परिमंडळचे उपायुक्त संजय लाटकर यांची सायबर महाराष्ट्र विभागात पोलिस अधीक्षक पदी पाठवले. राज्य पोलिस सेवेतील पोलिस उपायुक्त प्रशांत कदम (परिमंडळ चार) यांची अनुसूचित जाती व जमाती आयोग, हेमराज राजपूत (परिमंडळ सहा) यांची सायबर महाराष्ट्र, ठाणे शहरचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांची एसीबी-ठाणे, वाशिमचे अपर पोलिस अधीक्षक भरत तांगाडे यांची ठाणे जिल्हा, राज्य गुप्तवार्ता विभागांचे (नागपूर) उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांची पुणे पोलिस आयुक्तालयात बदली केली.