Daksh Police Times
Pune : Daksh Police Times समाज कार्यातून ‘आपला माणूस’चे दर्शन घडविलेले व्यक्तिमत्व म्हणजे बाबा धुमाळ.
Tuesday, 08 Oct 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

राजकारण असो अथवा समाजकारण प्रतिमा आणि प्रतिभा जितकी महत्त्वाची असते त्याही पेक्षा योगदान हे श्रेष्ठ असते. याचे आदर्शवत उदाहरण म्हणजे मा. नगरसेवक बाबा धुमाळ. समाजाभिमुख कार्य करताना नागरिकांचा विश्वास महत्वाचा असतो.त्याही पेक्षा नागरिकांप्रती, समाजाच्या हितासाठी तुमची आत्मीयता अधिक महत्त्वाचे असते. ही आत्मीयता खऱ्याअर्थाने जोपासणारे बाबा धुमाळ यांनी त्यांच्या समाज कार्यातून ‘आपला माणूस’चे दर्शन घडविले आहे. सभ्य, सुसंस्कृत, सुशिक्षित आणि अभ्यासू असणारे बाबा धुमाळ यांना घरातून राजकीय वारसा आणि सामाजिक कार्याचा वसा लाभलेला नसतानाही स्वकर्तृत्वावर त्यांनी आपले वेगळेपण त्यांच्या सामाजिक कार्यातून सिद्ध केले आहे. त्यामुळेच सर्वांसाठी एक हक्काचा चेहरा म्हणून एक उत्तम नेतृत्व म्हणून बाबा धुमाळ यांच्याकडे पाहिले जाते.

तसा धुमाळ कुटुंबाला राजकीय वारसा नसतानाही त्यांनी सामाजिक कार्यातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अफाट जनसंपर्क आणि नाविन्याची कास धरणारे बाबा धुमाळ यांचे ‘समस्या कोणतीही असू द्या त्याचे तत्काळ निवारण झालेच पाहिजे’ हे तत्व सदैव आहे. त्यामुळेच आजपर्यंत समाजातील सर्व स्तरातील वर्गांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. मुळात समाज कार्य करताना समाज हे माझे कुटुंब आहे, मीही त्यांचा एक सदस्य आहे. या भावनेमुळे ते समाजमनाचा आरसा बनले आहेत. नागरी समस्या असो किंवा विकासात्मक कामे अथवा नागरिकांना येणाऱ्या अडचणी यासाठी २४ तास उपलब्ध असणारे बाबा हे सर्वांसाठीच आधारवड ठरले आहे. शिक्षण असो किंवा कला, क्रीडा, साहित्य, आरोग्य, सांस्कृतिक असे अनेक क्षेत्रात बाबा हे सक्रिय आहेत आणि त्या – त्या क्षेत्रात अव्वलही ठरले आहेत. त्यामुळेच प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना पसंतीचे स्थान आहे. यातूनच एक सक्षम नेतृत्व म्हणून बाबांकडे पाहिले जाते. त्याचबरोबर त्यांच्या पत्नी दिपालीताई धुमाळ या देखील मागील अनेक वर्षापासून नगरसेवक पदावर असून पुणे महानगरपालिकेचे अतिशय महत्त्वाचे पद विरोधी पक्षनेते हे देखील प्रामुख्याने त्यांनी संभाळलं त्याचमुळे गेल्या वीस वर्षापासून वारजे करांनी त्यांना पुणे महानगरपालिके मध्ये जाण्याची संधी दिली.

स्वच्छतेवर भर…

आपला परिसर हा स्वच्छ असला पाहिजे तरच प्रत्येकाचे आरोग्य जपले जाईल. या हेतूने कार्यरत असणारे बाबा व त्यांचा मित्र परिवार आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्याशी उत्तम समन्वय साधून असतात. इतकेच नाही तर त्यांच्यासमवेत एक माणूस म्हणूनही कार्य करतात. मात्र माणुसकी कायम जोपासतात. त्यामुळेच प्रशासकीय यंत्रणेत ‘आपला माणूस’ म्हणून त्यांना आदराचे स्थान आहे. स्वच्छतेचे महत्त्व पटावे, आरोग्याप्रती सजग रहावे आणि केवळ नागरिक नाही तर स्वच्छता कर्मचारी यांच्या आरोग्याविषयी काळजी घेण्यासाठी ते विविध उपक्रमही राबवत असतात. प्रत्येक रविवारी ई वेस्ट संकलनाचा कॅम्प देखील आयोजित केला जातो.

नागरिकांसाठी सदैव दक्ष

ड्रेनेज लाईनची समस्या असू द्या, किंवा रस्त्यांचे प्रश्न… नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांचे निवारण करण्यासाठी बाबा हे सदैव दक्ष असतात. लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे या हेतूने ते कार्यरत आहेत . सतत पाठपुरावा घेणे आणि समस्यांचे निवारण करणे याकडे त्यांचा भर असतो. त्यामुळेच नागरिकांसाठी कायम सजग राहणारे बाबा यांचे कार्य हे गौरवास्पद ठरले आहे. एकप्रकारे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एक आश्वासक चेहरा म्हणून बाबा धुमाळ यांच्याकडे पाहिले जाते. २४ तास उपलब्ध असणारा एक हाडाचा कार्यकर्ता अशी ओळख त्यांची जनमानसात झाली आहे.