Daksh Police Times
Pune : Daksh Police Times खुनातील आरोपीस १२ तासांत अटक चिंचवड पोलीस स्टेशनची कारवाई
Monday, 07 Oct 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

 दि.०६/१०/२०२४ रोजी रात्री २१/४५ वा चे सुमारास चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीत विजय बिअर बारचे समोर, कुनाल रिव्हर व्हयुव सोसायटीचे बाजुला, चिंचवड, पुणे येथे मयत इसम नामे अमीर मकबुल खान वय ३४ वर्षे रा. बैठी चाळ, वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड पुणे हा जकात नाका कडून रिव्हर व्हयु चौकाकडे जाणाऱ्या रोडचे कडेला असलेल्या देशी दारुचे दुकानात दारु विकत घेत काऊंटरजवळ थांबलेला होता. शेजारी एक अज्ञात इसम हा दारु पीत थांबलेला असतांना सदर अज्ञात इसमाने त्याचा दारूचा ग्लास तेथे बाजुला असलेल्या तीन्हाइत इसमास प्यायला दिला. अज्ञात इसमाने त्याचा दारूचा उष्टा ग्लास ती-हाइत इसमास दिला म्हणून अमीर मकबुल खान यास राग आला व त्याने अज्ञात इसमास शिवीगाळ करून चप्पलेने मारले तेव्हा सदरचा अज्ञात इसम दुकानाचे बाहेर गेला व त्याचे मागे अमीर मकबुल खान हा देखील बाहेर गेला. दुकानाचे बाहेर त्यांचेत पुन्हा हाणामारी चालु झाली तेव्हा अमीर मकबुल खान याने सदर अज्ञात इसमास वीट फेकून मारली. त्यामुळे चिडून जावून अज्ञात इसमाने त्याचेकडील स्कुड्रायव्हर अमीर मकबुल खान याचे छातीत खुपसून त्याचा खुन केला म्हणून चिंचवड पोलीस स्टेशन गुन्हा रजी नं. ४०५/२०२४ बी.एन.एस. कलम १०३ प्रमाणे दाखल करणेत आला आहे.

मा. श्री. विनय कुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी चिंचवड पोलीस स्टेशन गुन्हा रजी नं. ४०५/२०२४ बी.एन.एस. कलम १०३ प्रमाणे दाखल खुनाचे गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून सदरचा गुन्हा उघड करून आरोपीस तात्काळ ताब्यात घेणेबाबत सुचना दिल्या. त्या अनुषंगाने श्री जितेंद्र कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चिंचवड पोलीस ठाणे यांनी त्यांचे अधिनस्थ असलेल्या तपास पथकाकील पोउपनि राम जाधव, परी-पोउपनि अजित दुधे व तपास पथकातील अंमलदार यांना सदरचा गुन्हा उघड करून आरोपीस तात्काळ ताब्यात घेणेबाबत सुचना दिल्या. पोउपनि राम जाधव, परी पोउपनि अजित दुधे व त्यांचे पोलीस पथकातील अंमलदार यांनी घटनास्थळ परिसरातील सर्व सिसीटीव्ही फुटेजची पाहणी केली त्यामधुन एका संशयीत इसमाचे गुन्हयाचे ठिकाणचे हालचालीवरुन त्यानेच गुन्हा केल्याचे निष्पन्न करणेत आले. साक्षीदारामार्फत त्याचेबाबत सविस्तर माहीती प्राप्त करत असताना सदर इसमाचे नाव यशवंत आत्माराम बगाडे वय ४२ वर्षे रा. चिंचवडेनगर, चिंचवड पुणे असल्याचे निष्पन्न झाले. तदनंतर रात्री दरम्यान तपास पथकचे अधिकारी व अंमलदार यांनी दोन टिम तयार करून आरोपीचा चिंचवडेनगर व दळवीनगर भागात तांत्रीक पध्दतीने शोध घेवून १२ तासाचे आत मुसक्या आवळल्या आहेत. सदरची कारवाई मा. श्री. विनय कुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. शशिकांत महावरकर साो, पोलीस सह आयुक्त पिंपरी चिंचवड, श्री वसंत परदेशी सोो, अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. स्वप्ना गोरे साो, पोलीस उप आयुक्त, परि १, पिंपरी चिंचवड, मा. श्री. मुगुटलाल पाटील, सहा. पोलीस आयुक्त साो, चिंचवड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली श्री जितेंद्र कोळी, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पोउपनि राम जाधव, परी-पोउपनि अजित दुधे, पोलीस अंमलदार धर्मनाथ तोडकर, उमेश मोहीते, उमेश वानखेडे, रोहीत पिंजरकर, पंकज बदाने, अमोल माने, रहीम शेख, प्रितम फरांदे, जगदिश भामरे, भाग्यश्री जमदाडे, नुतन कोंडे यांनी मिळून केली आहे.