:केंद्राच्या अमृत २ योजनेतून पंतप्रधानांच्या हस्ते झाला पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ
भडगाव प्रतिनिधी भास्कर शार्दुल-
केंद्र सरकारच्या अमृत योजनेच्या २ टप्प्याअंतर्गत भडगाव शहरासाठी पाणीपुरवठा योजना,गिरणा नदी पात्रात पक्का बंधारा बांधकाम मंजूर झाला असून, याचा उद्घाघाटनाचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते २ ऑक्टोंबर रोजी पार पडला.
या योजनेमुळे भडगाव शहराला एक संजीवनी मिळाली असून भडगाव शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने गिरणा नदी पात्रात पक्का बंधारा बांधकाम करण्यात येणार असुन योजनेत समाविष्ट प्रमुख बाबी पुढील प्रमाणे असतील
•गिरणा नदी पात्रात आवर्तनाचे पाणी साठवण्यासाठी बंधारा (के.टी.वेअर)
* जॅकवेल (बंधारा जवळील नदीपात्रातील विहीर)
•जलशुद्धीकरण केंद्र बंधारा ते जलशुद्धीकरण केंद्र पर्यंत मुख्य जलवाहीनी
•मुख्य जलवाहीनी (जलशुद्धीकरण केंद्र ते शहरातील विविध जलकुंभ पर्यंत)
•एमबीआर (जलशुद्धीकरण केंद्रावरील १९ लाख लिटर क्षमतेचा शुद्ध पाणी साठवण जलकुंभ)
•ईएसआर (वितरण व्यवस्थेवरील ५.८० लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ) पेठ भागासाठी
* ईएसआर (वितरण व्यवस्थेवरील जलकुंभ) २.३० लाख लिटर क्षमतेचा वडघे गावासाठी
•शहरात संपुर्ण अंतर्गत वितरण पाईप लाईन १२५ कि.मी. रस्ते दुरूस्ती (पाईपलाईन खोदकामातील रस्ते दुरूस्ती)
•नळ जोडण्या
•मजबुतीकरण संरक्षण भिंती, विद्यमान जलकुंभ मजबुतीकरण
•संरक्षण भिंती विद्यमान जलकुंभ
•संरक्षण भिंती,विद्यमान जलकुंभ मजबुतीकरण
•पंप (बंधारामधून जलशुद्धीकरण केंद्र पर्यंत पाणी नेण्यासाठी १८० एच.पी. चे ३
•पंप) सौर ऊर्जा संयंत्र (जलशुद्धीकरण केंद्रा करीता)
आदी बाबींचा समावेश असून भडगाव शहरासाठी शुभारंभ झालेला सदर योजनेमुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे. अशी माहिती भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी दिली आहे.तसेच या गोड अशा उद्घघाटन कार्यक्रमा प्रसंगी पाचोरा - भडगाव मतदार संघाचे भाजपा विधानसभा निवडणुक प्रमुख अमोलभाऊ शिंदे हे उपस्थित होते, या प्रसंगी भडगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री, रवींद्र लांडे ,मा नगराध्यक्ष श्री,अतुल पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष श्री, सोमनाथ पाटील शहराध्यक्ष मुन्ना परदेशी, नरेंद्र पाटील,भाजपा माजी सैनिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष देविदास पाटील, बापू शार्दुल, विशाल पाटील, युवा मोर्चा शहराध्यक्ष विशाल चौधरी, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस विकास महाजन, युवा मोर्चा विधानसभा संयोजक किरण शिंपी, भाजपा क्रीडा प्रकोष्ट तालुका संयोजक रवींद्र वाडेकर, मच्छीमार सेलचे तालुका संयोजक विश्वनाथ भोई आदि पदाधिकारी उपस्थित होते.