Daksh Police Times
Pune : Daksh Police Times अंबड पोलीसांनी मागील दोन वर्षांपासुन घरफोडी करून चोरी करणा-या अटटल आरोपीचा शोध घेवुन त्याचेकडुन एकुण १३,५४,९३०/- रूपये किमतीचा मुददेमाल हस्तगत करून अंबड पोलीस ठाणे हददीतील एकुण ०८ गुन्हे उघड केले
Wednesday, 02 Oct 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

अंबड पोलीसांनी मागील दोन वर्षांपासुन घरफोडी करून चोरी करणा-या अटटल आरोपीचा शोध घेवुन त्याचेकडुन एकुण १३,५४,९३०/- रूपये किमतीचा मुददेमाल हस्तगत करून अंबड पोलीस ठाणे हददीतील एकुण ०८ गुन्हे उघड केलेबाबत...
मा. पोलीस आयुक्त सो, श्री. संदिप कर्णिक सो, नाशिक शहर, मा. पोलीस उप-आयुक्त सो, परीमंडळ-१, नाशिक शहर, श्री. किरण चव्हाण सो, मा. पोलीस उप-आयुक्त श्रीमती मोनिका राउत मॅडम, परीमंडळ-२, नाशिक शहर मा. सहा. पोलीस आयुक्त सो, श्री. शेखर देशमुख, अंबड विभाग, नाशिक यांनी घरफोडी करणाऱ्या आरोपीतांचा शोध घेवुन मालमत्तेसंदर्भात गुन्हे उघडकिस आणण्यासाठी सुचना व मार्गदर्शन केले होते. त्याप्रमाणे अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल पवार तसेच पोलीस निरिक्षक काईम श्री. जयंत शिरसाठ यांचे मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाणेच्या गुन्हे शोध पथकाने घरफोडीचे एकुण ०८ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
मा. वरीष्ठांच्या आदेशाप्रमाणे अंबड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस पोउनि/झनकसिंग घुनावत, पो.ना./४३५ राहुल जगझाप, पोशि / ९३० राकेश राऊत, पोशि. /२११४ मयुर पवार, पोशि / १५६६ सागर जाधव, पोशि / २२२९ घनश्याम भोये, पोशि /२५४७ समाधान शिंदे, पोशि / २६९७ प्रविण राठोड, पोशि / २५०१ अदिनाथ बारगजे यांनी मागील दिड महिष्यांपासुन सी.सी.टी.व्ही. फुटेज व गुप्त बातमीदारांमार्फत शोथ घेवुन मागील दोन वर्षापासुन नाशिक शहरात सतत चोरी करणा-या अटल चोर फारूक रज्जाक काकर, वय-४८ वर्षे, धंदा-मजुरी, रा. मोठा राजवाडा, बागवान पुरा, भद्रकाली, नाशिक मुळ पत्ता- लोहारी बुद्रुक, पाचोरा, जळगाव यास साहित्यांसह धाडसाने पकडले. त्यानंतर त्यास अंबड पोलीस ठाणेस आणुन गुन्हे शोध पथकाने त्यास विश्वासात घेवुन तसेच बुध्दी कौशल्याचा वापर करून तपास केला असता त्याने अंबड पोलीस ठाणे हद्दीत एकुण ०८ ठिकाणी केलेल्या घरफोडी करून चोरी केल्याची कबुली दिली, त्याचेकडुन घरफोडी करून चोरी केलेला एकुण १८८.१९ ग्रॅम वजनाचे सोने व १५६ ग्रॅम चांदी असे एकुण १३,५४,९३०/- रूपये किमतीचा चा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याप्रमाणे अंबड पोलीस स्टेशन मधील एकुण ०८ गुन्हे उघड करून एकुण १८८.१९ ग्रॅम वजनाचे सोने व १५६ ग्रॅम वजनाची चांदी असे एकुण १३,५४,९३०/-रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त सो, श्री. संदिप कर्णिक, मा. पोलीस उप आयुक्त साो, परिमंडळ -०१, श्री. किरण चव्हाण सो, मा. पोलीस उप आयुक्त साो, परिमंडळ -०२ श्रीमती मोनिका राऊत मॅडम, सहा पोलीस आयुक्त साो., श्री शेखर देशमुख, अंबड विभाग तसेच अंबड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पोनि / सुनिल पवार तसेच अंबड पोलीस ठाणेचे काईम पोलीस निरिक्षक श्री. जयंत शिरसाठ यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सपोनि/किरण रौंदळे, पोउनि/झनकसिंग घुनावत, पो.ना./४३५ जगझाप, पोशि / ९३० राऊत, पोशि. / २११४पवार, पोशि / १५६६ जाधव, पोशि/२२२९ भोये, पोशि /२५४७ शिंदे, पोशि / २६९७ राठोड, पोशि/२०५४ करंजे, पोशि / २००३ गाढवे, पोशि २३४६/ मते, पोशि /२३९१ भुरे, पोशि /१९४३ निकम, पोशि/ २०९३ पाटील, पोशि/२५०१ बारगजे यांनी केली आहे.