दिनांक २१/०९/२०२४ रोजी रात्रौ १२/३० वाजता वारजे पोलीस स्टेशन हद्दीत जबरी चोरी सह इसम नामे अमोल निवंगुणे याच्या खुनाचा प्रकार घडला असता घटनास्थळी मा. पोलीस उप-आयुक्त
श्री.निखिल पिंगळे ,गुन्हे शाखा, पुणे शहर, मा. पोलीस उप-आयुक्त श्री. संभाजी कदम, परिमंडळ 3 पुणे शहर, मा. सहा.पो.आयुक्त श्री.गणेश इंगळे, गुन्हे 1, पुणे शहर, मा. सहा.पो.आयुक्त श्री.सरदार पाटील, कोथरूड विभाग पुणे शहर मा.सहा.पो.आयुक्त श्री. परमार सिंहगड विभाग पुणे यांनी स्वतः भेट देऊन सूचना केल्या. त्यानुसार तांत्रिक विश्लेषण व तपास कौशल्याने संशयित आरोपी नामे प्रसन्न कोकरे याचे नाव निष्पन्न केले व त्याचा शोध घेतला शोध घेताना माहिती मिळाली की सदर संशयित आरोपी हा त्याच्या आनंद विहार, सिंहगड रोड येथील राहत्या घराजवळ आला आहे. नमूद ठिकाणी जाऊन आरोपीला पाठलाग करून पकडले व त्यास त्याचे नाव व त्यानी केलेल्या गुन्ह्याबद्दल विचारले असता त्याने त्याचे नाव प्रसन्न साहेबराव कोकरे, वय 27 वर्ष, रा. आनंद विहार, सिंहगड रोड, पुणे येथे राहत असून सदरचा गुन्हा केला असल्याचे कबूल केले. मयताची पत्नी हिचेेशी त्याची मैत्रीपूर्ण ओळख होती आणि त्यावरून मयताने आरोपी प्रसन्न कोकरे यास यापूर्वी मारहाण केली होती व मयत इसम हा पत्नी बरोबर आरोपीच्या नावाने संशय घेत होता. सदर आरोपीने आरोपीस झालेली मारहाण व मैत्रीपूर्ण संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा खून केला आहे. आरोपीला वारजे पोलीस स्टेशन येथे पुढील कारवाईसाठी ताब्यात दिले आहे. मयताची पत्नी व इतर कोणी गुन्ह्यामध्ये सहभागी आहे का याबाबत चौकशी चालू आहे व कशापद्धतीने सहभाग आहे याची खातरजमा करत आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही,
मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा.श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. शैलेश बलकावडे , अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर , मा. श्री प्रवीण कुमार पाटील अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे मा.श्री. निखिल पिंगळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, मा.श्री. गणेश इंगळे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे-1, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली
दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक एक 1, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री नंदकुमार बिडवई व खंडणी विरोधी पथक 1 कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांनी स्वतः व
पोलीस अंमलदार सयाजी चव्हाण, गणेश ढगे, दुर्योधन गुरव, राजेंद्र लांडगे,प्रफुल्ल चव्हाण, महेश पाटील, साईकुमार कारके अंकुश भिसे यांनी केली आहे व सदर तपासात श्री शेंडगे,व.पो.नि वारजे पो स्टे. व वारजे पोलीस स्टेशन कडील डी.बी चे अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेऊन सहकार्य केले आहे .