Daksh Police Times
Pune : Daksh Police Times जुन्या खुनाचा वचपा काढण्याच्या तयारीत असलेल्या एन्जॉय ग्रुपवर लोणीकंद पोलीसांकडुन मोक्का कारवाई
Thursday, 19 Sep 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times


स्वारगेट येथे सन २०१३ साली कुणाल शंकर पोळ याचा खुन करणाऱ्या आरोपीचा खुन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एन्जॉय ग्रुपच्या एकुण ०८ आरोपीं विरुध्द लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर कडुन पाठविण्यात आलेल्या मोक्का प्रस्तावास मा.अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम २३ (१) (अ) अन्वये मंजुरी दिली आहे.
दि.२९/०८/२०२४ रोजी रात्री ११/३० वा.चे सुमारास हॉटेल स्वराजगार्डन, कोलवडी, पुणे येथे पवार वस्ती येथील राहते बिल्डींगकडे गुन्ह्यातील फिर्यादी हे यांचे ताब्यातील इनोव्हा कार मधुन जात असताना राहते बिल्डींग पासुन पुढे कोलवडीकडे जाणा-या रोडवर जुन्या वादातुन घातपात घडवण्याच्या हेतुने आरोपी नामे १) अमित म्हस्कु अवचरेऊर्फ औचरे, वय २७ वर्ष, रा. फुरसुंगी, हडपसर, पुणे २) सुमित उत्तरेश्वर जाधव, वय २६ वर्ष, रा. गंजपेठ, पुणे ३) लतिकेश गौतम पोळ, वय २२ वर्ष, रा. कात्रज कोंढवा रोड, पुणे ४) शुभम ऊर्फ मॅटर अनिल जगताप, वय २७ वर्ष, रा. भेकराईनगर, हडपसर, पुणे ५) ओंकार ऊर्फ भैय्या अशोक जाधव, वय २४ वर्ष, रा. भारती विद्यापीठ, पुणे ६) अजय ऊर्फ सागर बाळकृष्ण हेगडे, वय २७ वर्ष, रा. भेकराईनगर, फुरसुंगी, पुणे ७) राज बसय्या ऊर्फ बसवराज स्वामी, वय २६ वर्ष, रा. भेकराईनगर, फुरसुंगी, पुणे, यांना अटक करुन व एक पाहिजे आरोपी यांनी तयारी करुन हल्ला करण्याच्या बेतात असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांचेकडे तपास करीत असताना ते अशाच प्रकारे संघटितपणे वारंवार गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न
झाल्याने तसेच ते बेकायदेशीर मार्गाने गैरवाजवी आर्थिक फायदा व इतर फायदा मिळविण्याच्या उद्देशाने तसेच हिंसक मार्गाचा अवलंब करुन स्वतःचे वर्चस्व रहावे म्हणुन गुन्हे केल्याचे तपासा मध्ये
निष्पन्न झाले आहे. सदर आरोपी हे सदरचे गुन्हे संघटितपणेकरीत असल्याचे पुर्व रेकॉर्डवरुन दिसुन आल्याने प्रस्तुत गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (II),
३(२), ३(४) या कलमांचा अंतर्भावकरणे कामी लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पंडीत रेजितवाड यांचे मार्गदर्शनाखाली, सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलीस नाईक
प्रशांत कापुरे, पोलीस अंमलदार सागर कडु, शुभम सातव, सुधीर शिवले यांनी प्रस्ताव तयार करुन मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०४ पुणे श्री. हिंमत जाधव, यांचे मार्फतीने मा. अपर पोलीस
आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे श्री. मनोज पाटील यांना प्रस्ताव सादर केला होता.