Daksh Police Times
Pune : Daksh Police Times गोठ्यात काम करणाऱ्याला आरोपी बनवण्यासाठी ड्रग्ज ठेवले, मुंबई पोलिसांचं कृत्य सीसीटीव्हीत कैद
Saturday, 31 Aug 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

मुंबई पोलिसांची ओळख ही जगात उत्तम पोलीस अशी आहे. अनेक गुन्ह्यांची उकल शिताफीने करण्यात मुंबई पोलिसांचा हातखंडा आहे. अगदी खुनाचं प्रकरण असेल तरीही आरोपीचा छडा लावण्यात मुंबई पोलीस निष्णात समजले जातात. मात्र सध्याच्या घडीला एक घटना अशी घडली आहे ज्यामुळे मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला तडा गेला आहे. मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला काळीमा फासण्याचं काम चार पोलिसांनी केलं आहे. या चारजणांमध्ये एक पोलीस उपनिरीक्षक आणि तीन हवालदार ( Mumbai Police ) यांचा समावेश आहे. या चौघांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्या व्हिडीओत एका माणसाच्या खिशात ड्रग्ज ठेवताना हे चौघे दिसत आहेत. डमी आरोपी बनवण्यासाठी हे कृत्य करताना पोलीस ( Mumbai Police ) दिसत आहेत. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर या चौघांना निलंबित करण्यात आलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यानंतर या चौघांवर कारवाई करण्यात आली आहे.

काय दिसतं आहे फुटेजमध्ये ?

सीसीटीव्ही कॅमेरातील चित्रीकरणात हे दिसून येतं आहे की दोन पोलीस उभे आहेत आणि इतर दोघं गोठ्यात काम करणाऱ्या व्यक्तीची झडती घेत आहेत. त्यानंतर हेदेखील दिसतं आहे की झडती घेता घेता त्या व्यक्तीच्या पँटच्या खिशात एक पोलीस ( Mumbai Police ) ड्रग्ज ठेवतो. ड्रग्ज प्रकरणात बोगस आरोपी बनवण्यासाठी हे करण्यात आल्याचं समजतं आहे. यानंतर आता मुंबई पोलिसांवर ( Mumbai Police ) विश्वास कसा ठेवायचा? असा प्रश्न लोक विचारु लागले आहेत. मुंबईतल्या खार या पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या या चार पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.