Daksh Police Times
Pune : Daksh Police Times रेकॉडवरील गुन्हेगार गावठी पिस्टलसह जेरबंद
Monday, 19 Aug 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

 

दि.१५/०८/२०२४ रोजी स्वांतत्र्य दिनाच्या अंनुशंगाने गुन्हे शाखा युनिट ३ मधील अधिकारी व स्टार्फे असे रेकॉर्डवरील गुन्हेगार चेकिंग व लॉज चेकीग व अवैध्य धंदयावर कारवाई करण्याकरिता गस्त करित असताना पोलीस अंमलदार प्रतिक मोरे यांना बातमी मिळाली की, मागील दोन दिवसापुर्वी अप्पर डेपो, बिबवेवाडी, पुणे येथे इसम नामे गणेश गणेश उदय जाधव वय २१ वर्षे, धंदा. डायव्हर रा. गणेश नगर सोसायटी, लेन नं. २, वारजे माळवाडी, पुणे याने तुषार शेडगे रा. बिबवेवाडी याला धमकवण्यासाठी पिस्तल दाखवला होता तो सध्या गणेश पुरी, रामनगर, वारजे माळवाडी, सार्वजनिक रोडवरती, पुणे येथे थांबलेला असुन त्याची वर्णनासह बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन नमुद इसमाचा शोध घेतला असता पत्यावर मिळुन आला त्याच्या कडुन कि. रु.४००००/- चे देशी बनावटीचे लोखंडी पिस्तल मिळुन आले ते सपोनि ज्ञानेश्वर ढवळे यांनी जप्त करून ताब्यात घेतले.

नमुद आरोपी नामे गणेश गणेश उदय जाधव वय २१ वर्षे, धंदा. डायव्हर रा. गणेश नगर सोसायटी, लेन नं. २. वारजे माळवाडी, पुणे याचे विरूदध तो विधीसघर्ष बालक असताना खुन व बेकायदेशिर जमाव जमवुन दुखापत करणे असे कोथरूड व सिंहगड पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद आहे. त्याचे विरूदध अग्नीशस्त्र बाळगले बाबत पोलीस अंमलदार प्रतिक मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वारजे माळवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर-३२२/२०२४ भारतीय शस्त्र अधि कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधि कलम ३७(१) सह १३५. नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे त्यास पुढील कार्यवाही कामी वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही मा.श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा.श्री रंजनकुमार शर्मा सह-पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा.श्री शैलेश बलकवडे अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, मा.श्री निखिल पिंगळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा पुणे शहर मा.श्री. गणेश इंगळे सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर यांचे मार्गदर्शन व सुचनेनुसार रंगराव पवार वरिष्ठ पोलीस निरिक्षक, युनिट ३ गुन्हे शाखा पुणे शहर, सहा. पो. निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पो. हवा. शरद वाकसे, विनोद भंडलकर सुजित पवार, केदार आढाव, संजीव कळंबे, पो.शि इसाक पठाण, हरिष गायकवाड, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकावडे, प्रतिक मोरे, गणेश शिंदे, केलेली आहे.. सोनम नेवसे यांनी कामगिरी