Daksh Police Times
Pune : Daksh Police Times महानगरपालिका व प्रशासन 2 दिवसांपासून झोपेत, शाळेतील मुलांवर सांडपाण्याचे ओघ
Friday, 26 Jul 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

वारजे : एनडीए मुख्य रस्त्यावर गणपती माथा ते वारजे माळवाडी चौक (सह्याद्री वाडेवाला समोर )दरम्यान गेल्या 2 दिवसांपासून ड्रेनेज 'लाईन चे सांडपाणी वाहत असल्याने स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. व्यावसायिक, पादचारी, वाहनचालक त्रस्त झाले आहेत. यावर तातडीने उपाययोजना करा

शालेय मुलांना अधिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे आणि जवळपासच्या शाळांमध्येही वाहतूक आणि दिवसभर वाहणाऱ्या पाण्यामुळे अडचणी येत आहेत

पुणे मनपा वार्षिक २०२३- २४ अंदाजपत्रकामध्ये या गणपती माथा ते वारजे माळवाडी चौक मुख्य रस्त्यावरील संपूर्ण ड्रेनेज लाईन बदलणे या साठी निधीची तरतूद करण्यात आली होती परंतु प्रशासन व संबंधित अधिकारी यांच्या दुर्लक्षतेमुळे सदर बजेट लॅप्स झाले. यामुळे सदर परिसरातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे धुमाळ यांनी संगितले.