Daksh Police Times
Pune : Daksh Police Times रामेश्वर मोरे मोक्क्यातील सहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीस केले जेरबंद
Monday, 22 Jul 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

 

दिनांक २३/०२/२०२४ रोजी वारजे माळवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं. ८०/२०२४ भा.दं.वि. कलम ३०७,३२४,३२३,५०६,१४३,१४४,१४७,१४८,१४९,४२७, आर्म अॅक्ट कलम ४ (२५), सह क्रिमीनल अमेंडमेंन्ट लॉ अॅक्ट कलम ७. मपोअधि कलम ३७ (१) (३) सह १३५, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३(१) (।।), ३(२) व ३(४) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील ६ महिन्यांपासून फरार असलेला आरोपी मोन्या ऊर्फ रामेश्वर मोरे याचा शोध चालु असताना दिनांक २२/०७/२०२४ रोजी पोलीस अंमलदार प्रदिप शेलार व दक्ष पाटील यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकडून मोक्कामधील फरार असलेला मोन्या मोरे हा खानवस्ती रामनगर येथील मज्जीदजवळ येणार असल्याची बातमी मिळाल्याने सपोनि रणजीत मोहिते, पोलीस अंमलदार प्रदिप शेलार, दक्ष पाटील, विक्रम खिलारी, विकास पोकळे व सत्यजित लोंढे असे खानवस्ती येधील मज्जीदजवळ पोलीस असल्याची ओळख लपवून सापळा रचून थांबले असताना काहीवेळाने सदरठिकाणी एक इसम तोंडाला मास्क लावून आला व कोणास तरी फोन लावत थांवला असताना सदरचा इसम हा रामेश्वर ऊर्फ मोन्या मोरे हाच असल्याचे पोलीस अंमलदार दक्ष पाटील यांनी ओळखून इतर स्टाफला इशारा केला. त्यावरून सदर स्टाफने त्यास लागलीच पकडून नाव पत्ता विचारला असता त्याने रामेश्वर ऊर्फ मोन्या सुभाष मोरे, वय २४ वर्षे, रा. सनं ३६/२, खान वस्ती रोड, गणपती मंदिर जवळ, रामनगर वारजे पुणे असे सांगितले. मोक्का अंतर्गत दाखल गुन्ह्यातील पाहीजे आरोपी हा तोच असल्याची खात्री झाल्याने त्यास ताब्यात घेवून अटक केली आहे. अधिक तपास श्री. रंगनाथ उंडे, सहा. पोलीस आयुक्त साो, कोथरुड विभाग, पुणे शहर हे करत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. रंजनकुमार शर्मा, सह- पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. प्रविणकुमार पाटील साो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्री संभाजी कदम साो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०३, पुणे शहर, मा. श्री. रंगनाध उंडे साो, सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग, पुणे शहर, यांचे आदेशाने वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निळकंठ जगताप यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. रणजित मोहिते, पोलीस उपनिरीक्षक श्री. रामेश्वर पार्वे तसेच अंमलदार पोलीस हवालदार प्रदिप शेलार, पोलीस कॉन्स्टेवल मनोज पवार, विजय भुरुक, दक्ष पाटील, श्रीकांत भांगरे, संभाजी दराडे, विक्रम खिलारी, शिरीष गावडे, अमोल सुतकर, विकास पोकळे व सत्यजित लोंढे यांनी केलेली आहे.