Daksh Police Times
Pune : Daksh Police Times सेवक सेवाभावी संस्था जळगाव व पोलीस दक्षता महासंघाच्या वतीने गौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला
Wednesday, 10 Jul 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

विषय: आपल्या लोकप्रिय दैनिकातून सदर बातमी प्रसिद्ध करण्याबाबत...

सेवक सेवाभावी संस्था व पोलीस दक्षता महासंघाचे वतीने हिरकणी व महाराष्ट्र गौरव पुरस्काराने 31 महिला पुरुषांचे सन्मान व पदग्रहण सोहळा संपन्न.

पुणे: सेवक सेवाभावी संस्था जळगाव व पोलीस दक्षता महासंघाच्या वतीने राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार व महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळा तसेच पोलिस दक्षता महासंघाच पदग्रहण समारंभ सोहळा पुणे येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स स्वारगेट पुणे येथे संपन्न झाला.
सदर कार्यक्रमांमध्ये सामाजिक कार्यक्रमांमध्ये तसेच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला ना राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार व व पुरुषांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन 31 महिला व  पुरुषांना सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार सन्मान सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर मराठी सिने अभिनेत्री किरण नाईकडे पाटील बाळुमामाचे नावाने चांगभलं फेम पार्वती तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पुणे महानगरपालिकेचे स्वच्छता अभियानाचे स्वच्छता दूत महादेव जाधव ,तर प्रमुख अतिथी म्हणून हिंदू महासंघाचे आनंद दवे, अॅड रमेश राठोड ,पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास कांबळे,मनोज तारे, पोलीस दक्षता महासंघ चे राष्ट्रीय अध्यक्ष रजनी दरेकर, बाळासाहेब ढमाले, सल्लागार  संजय दरेकर,सेवक सेवाभावी संस्था चे संस्थापक विशाल शर्मा , सचिव रंजना शर्मा होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणेश वंदनाने प्रारंभ करण्यात आले श्रेया गजरे व श्रावणी गजरे यांनी गणेश वंदना नृत्य सादर केले त्यानंतर कार्यक्रम प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना प्रमुख अतिथी किरण नाईकडे पाटील यांनी सांगितले कि आजच्या काळात महिलांनी अधिक सक्षम व कौशल्य चातुर्य आत्मसात करण्याची जास्त गरज आहे . छत्रपती शिवरायांच्या राज्यात जर कोणी महिलावर अत्याचार करीत होते त्या वेळी त्यांना जिजाऊ मार्गदर्शन करून त्या अत्याचारी गुन्हेगाराला देहदंड याची शिक्षा द्यायचे आजच्या वर्तमान युगामध्ये महिलाहून अत्याचार करणाऱ्या नराधमांना असे शिक्षा मिळणे म्हणजे दुर्मिळ आहे, त्यासाठी आजच्या युगामध्ये महिलांना चुल व मुल याच्या व्यतिरिक्त इतर कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे अशा नराधमांना छत्रपती शिवाजी राजे यांच्या युगातील शिक्षा मिळणे गरजेचे आहे तरच महिला  वरचे अत्याचार कमी होतील.
तसेच अॅडवोकेट रमेश खेमु राठोड यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की आजच्या घडीला महिलांना शिक्षण गरजेचे आहे आजची एक शिक्षित महिला आपल्या सात पिढीपर्यंतच्या लोकांना शिक्षीत बनवते, थांबा याचं नाही गड्या आता थांबायचं नाही असे घोष वाक्य देत त्यांनी सांगितले की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक महिलेचे पत्नी, आई ,बहीण व मैत्रीण म्हणून योगदान असते  शिक्षीत महिले मुळेच माणसाची प्रगती होते.
कार्यक्रम अध्यक्ष व पुणे महानगरपालिका चे स्वच्छता दूत महादेव जाधव यांनी आपले विचार ठेवताना सांगितले की जसं रोज आपण आपल्या घरातील , परिसरातील कचरा बाहेर काढतात व स्वच्छता करतात तसेच आजच्या घडीला महिलांविषयी आपल्या मनातील कचरा काढणे गरजेचे आहे जोपर्यंत पुरुष आपली मानसिक वृत्ती बदलणार नाही तोपर्यंत समाजात महिलांच्या सन्मानामध्ये बदल घडणार नाही त्यासाठी अगोदर आपल्या मनातली स्वच्छता करणे गरजेचे आहे. तेव्हाच आपल्या समाजातील महिला खुल्या मनाने समाजात कार्य करू शकतील. संस्थापक अध्यक्ष विशाल शर्मा यांनी प्रस्तावना पर  सांगितले की समाजामध्ये तळागाळात ज्या महिलांनी आपल्या स्वकर्तृत्वावर विश्व निर्माण केलेले आहे अशा महिलांचा सन्मान सोहळा संस्थेच्या वतीने  2018पासुन दरवर्षी राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार सन्मान सोहळा आयोजित करण्यात येतो या वर्षी हिरकणी पुरस्कार चे सातवे वर्ष होते.
पुरस्कार सोहळा आधी सेवक सेवाभावी संस्था अतंर्गत पोलीस दक्षता महासंघाच्या नवीन कार्यक्रमाची दोन वर्षा साठी निवड करण्यात आली व सर्वांना ओळखपत्र देण्यात आले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल शर्मा, रंजना शर्मा ,रजनी दरेकर ,महादेव जाधव, बाळासाहेब ढमाले, संजय दरेकर जितेंद्र गुंदेशा, दिगंबर गजरे यांनी परिश्रम घेतले.

हिरकणी पुरस्कार प्राप्त पुरस्कार्थी 
अर्चना आप्पासाहेब कोळेकर, शितल रामचंद्र परब ,
लिना बाळासाहेब पांडे रजनी संजय दरेकर किरण नाईकडे पाटील  निर्मला सोनवणे, सुनिता दिंगबर गजरे धनश्री प्रकाश कदम
वैशाली वाघेरे , करिष्मा जाधव,

महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्राप्त पुरस्कार्थी
 ज्योती कृष्णाश्रीवास्तव,जळगाव,
कु सायली मारुती टोपकर, सांगली डॉ विठ्ठल जाधव 
प्रशांत कनोजिया हेल्प रायडर टिम ,अॅड रमेश खेमु राठोड,
अॅड विकास साहेबराव कांबळे,
दिगंबर सुरेश गजरे,
महादेवजी जीवराम जाधव, बाळासाहेब सुमन बबनराव ढमाले, उमेश दत्तात्रय महाडिक,
डॉ पंडित जाधव, विकास मस्के,
सतीश बाजीराव दरेकर ,सनी साजन गाडे,
प्रकाश साठे,आनंद दवे,
 अमित विजयराव सूर्यवंशी,
ज्ञानेश्वर उर्फ सुनील शिंदे पुणे