Daksh Police Times
Pune : Daksh Police Times व्यक्तीची २,४५,३०,०००/- रुपयाची फसवणुक करणारा आरोपी पिंपरी चिंचवड सायबर कडुन गुन्हा उघड
Friday, 05 Jul 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

कर्जाची रक्कम फेडण्यासाठी दिघी येथिल व्यक्तीची २,४५,३०,०००/- रुपयाची फसवणुक करणारा आरोपी पिंपरी चिंचवड सायबर कडुन ताब्यात घेऊन गुन्हा उघड

दाखल गुन्हयातील फिर्यादी यांना Vavnguard DNP Group या व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये मध्ये अॅड करुन त्यांना शेअर मार्केट संदर्भात टिप्स देण्यात येत होत्या. सदर ग्रुपमध्ये जे इतर व्यक्ती होते त्यांना रोजच्या रोज प्रॉफिट होत असल्याचे फोटो सदर ग्रुपवर पाठवित होते. त्यावेळी फिर्यादी यांना सुध्दा शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणुक करण्याची इच्छा झाली होती. त्यानंतर त्यांनी सदर ग्रुपच्या अॅडमिन सोबत संपर्क साधुन पैसे गुंतवणुक करण्याची इच्छा दाखविली होती. त्यांनतर ग्रुप अॅडमिन यांनी व त्याचे साथीदार यांनी फिर्यादी यांना शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणुक करण्यासाठी वेगवेगळे बैंक अकाऊंट देऊन त्याबर एकुण २,४५,३०,०००/- रु घेऊन फिर्यादी यांची आर्थिक फसवणुक केलेबाबत फिर्यादी यांनी दिघी पोलीस स्टेशन गु.र.न. २४५/२०२४ भादवी कलम ४२०, ४०६ माहिती तंत्रज्ञान कायदा २००० कलम ६६ (सी), ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सदर गुन्हयाचा समांतर तांत्रिक तपास सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी व पोशि पोशि २५६३ अतुल लोखंडे हे करीत होते. सदर गुन्हयाचे संबंधाने बैंक अकाऊंट व इतर तांत्रिक विश्लेषण केले

असता त्यामधील बैंक अकाऊंट हे सुरत गुजरात येथिल असल्याची माहीती मिळाल्याने त्याप्रमाणे आम्ही तात्काळ सदर ठिकाणी जाऊन शोध घेण्याची वरीष्ठांनकडुन परवानगी प्राप्त केली व त्या प्रमाणे पोउपनिरीक्षक रविद्र पन्हाळे व स्टाफ यांची टिम प्राप्त माहीतीच्या आधारे सुरत, गुजरात येथे पाठविली. त्याप्रमाणे त्यांनी आरोपींचा शोध घेऊन आरोपी श्री राधे इंटरप्रायजेस या नावाने अकाऊंट असलेला अकाऊंटधारक निकुंज अश्विनभाई मकवाना रा. जातरुडा, वराछा ता. लिलया, जि. अमरेली. सध्या रा. ८० नंबर, विक्रमनगर-०२, सितानगर, पुनागाम, सुरत, गुजरात यास तेथिल स्थानिक पोलीसांच्या मदतीने ताब्यात घेऊन त्याला सायबर सेल, पिंपरी चिंचवड येथे आणुन त्यांचेकडे गुन्हयाबाबत कौशल्यपुर्वक तपास करता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे व्यवसायात झालेल्या कर्जाची रक्कम फेडण्यासाठी केला असल्याची कबुली दिल्याने तसेच त्याचा गुन्हयात सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीने सदरचा गुन्हा त्याच्या परदेशातील व बाहेर राज्यातील साथीदारासह केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच आरोपीने गुन्हयात वापरलेल्या बैंक अकाऊंट विरुध्द भारतभरातुन एकुण ५६ तक्रारी प्राप्त झालेल्या असुन सदर अकाऊंटला ४ कोटी २९ लाख ४९ हजार ५८५/- रुपयाची उलाढाल झाली आहे.

सदरची कारवाई मा. विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. संदिप डोईफोडे पोलीस उपआयुक्त, गुन्हे पिंपरी चिंचवड, मा. विशाल हिरे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे, पोहवा ८४४ दिपक भौसल, पोशि २५६३ अतुल लोखंडे, पोशि २५६२ नितेश विचेवार, पोशि ३०८१ सौरभ घाटे, पोशि ३०८० श्रिकांत कबुले (सर्व नेमणुक सायबर सेल) यांच्या पथकाने केली आहे.