Daksh Police Times
भडगाव प्रतिनिधी :Daksh Police Times भडगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचा वृक्ष लागवडीसाठी अनोखा उपक्रम.
Saturday, 08 Jun 2024 18:00 pm

Daksh Police Times


भडगाव जागतिक पर्यावरण दिनाचे औचित साधून सार्वजनिक बांधकाम विभाग भडगाव तर्फे वृक्ष लागवड व सीड बॉल मोहीम राबवण्यात सुरुवात झालेली असून यंदाच्या पावसाळ्यात विविध भागात 500  झाडे लावली जाणार आहेत. यात 50 हजार सीड बॉल  तयार करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक अभियंता गणेश पाटील यांनी आज दिनांक 9जून रोजी सकाळी 11 वाजता सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय भडगाव येथे दिली. सर्व कर्मचाऱ्यांनी सामूहिक श्रमदान करून सुमारे 50 हजार सीड बॉल तयार करण्याचा निर्धार केला आहे सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय आवारात वृक्ष लागवड  करण्यात आली. तसेच इतर भागातील वृक्ष लागवड सीडबॉल रोपण करण्यात येणार आहे यात मुख्य स्थानिक आढळून येणाऱ्या तसेच कमी पाण्यात जगणाऱ्या कडुलिंबू, जांभूळ, सुळबाभूळ, सीताफळ यासारख्या झाडांच्या बिया गोळा करून त्यांचे सीड बॉल ओपन तयार करण्याची एक अखर्चित पद्धत आहे. तयार केलेले सीडबॉल हे सार्वजनिक बांधकाम उपविभाग भडगाव अंतर्गत सर्व रस्त्यांच्या कडेला पावसाळ्याच्या सुरुवातीस टाकण्यात येणार आहे तसेच सीडबॉल ओपन करून याद्वारे रोपे सुद्धा तयार करण्यात येणार आहे या सीड बॉलचे वाटप शहरात केले जाईल जास्तीत जास्त नागरिकांना10 रोपे शेतात किंवा परत बागेत लावण्यासाठी दिले जातील या मोहिमेत सहाय्यक अभियंता गणेश पाटील, कनिष्ठ अभियंता अक्षय सावंत, कनिष्ठ अभियंता जयराम जाधव, प्रदीप तायडे, जयवंत पाटील ,अभियांत्रिका सहाय्यक अभिजीत चव्हाण हे सर्व कर्मचारी सहभागी झाले.

- भास्कर शार्दुल