Daksh Police Times
Daksh Police Times पिंपरी चिंचवडमध्ये तरुणांच्या टोळक्याकडून वाहनाची व दुकानाची तोडफोड ...
Wednesday, 17 Apr 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

पिंपरी चिंचवड : काठ्या व कोयत्याने परिसरात दहशत निर्माण करत टोळक्याने चारचाकी गाडीची व दुकानाची तोडफोड करत मेडीकल चालकास मारहाण केली. तसेच गल्ल्यातील रोख रक्कम चोरुन नेली. ही घटना सोमवारी भोसरी येथील महात्मा फुले नगर येथे रात्री अकराच्या सुमारास घडली.

याप्रकरणी धिरज राजीव कांदे (वय 29 रा. अजमेरा हौसिंग सोसायटी, पिंपरी मुळ रा. मु.पो. बोरगाव खु, ता. बार्शी जि. सोलापूर) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी मुआज फिरोज मुजावर (वय 19 रा. भोसरी), जावेद इब्राहीम जावळे (वय-19), अजय नागेश कांबळे (वय 19), चेतन महेंद्र मनोहर (वय 19 सर्व रा. भोसरी) यांच्यावर आयपीसी 394, 34, आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे महात्मा फुलेनगर येथे विर नावाचे मेडीकल दुकान आहे.सोमवारी रात्री अकराच्या सुमारास धिरज कांदे हे त्यांच्या मेडीकलमध्ये काम करत होते.त्यावेळी आरोपी हातात काठ्या व कोयते घेऊन मेडीकलसमोर आले.त्यांनी मेडिकल समोर उभी असलेल्या सॅन्ट्रो कारच्या काचा कोयत्याने फोडून गाडीचे नुकसान केले.तसेच मेडिकलमध्ये शिरुन फिर्यादी यांना कोयत्याचा धाक दाखवून काठीने मारहाण केली.तसेच मेडिकलच्या काऊंटर मध्ये ठेवलेले दीड हजार रुपये चोरून नेले.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.बी. इंगळे करीत आहेत.