Daksh Police Times
Daksh Police Times खेड शिवापुर टोल नाक्यावरती गुंडाराज ...
Thursday, 11 Apr 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

हवेली तालुक्यातील कार चालकांना खेड शिवापुर टोल नाक्यावरती टोल माफी होणार असे आपण ऐकलेले आहे.
11 एप्रिल रोजी गुरुवारी संध्याकाळी 8.30 दरम्यान मी स्वतः खेड शिवापुर टोल नाक्यावरून येत होतो. त्यावेळी आलेला अनुभव, आत्तापर्यंत खेड शिवापुर टोल नाक्यावरती पेपरच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून व सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रवाशांना  त्रास होतो हे आपण सर्वांनी ऐकलेले आहे. MH १२ ला टोल माफी कधी मिळणार?
खेड शिवापुर टोलनाक्यावरती दादागिरी होते. गुंडागर्दी करून सर्वसामान्य प्रवाशांना टोल भरत असताना सुद्धा मानसिक त्रास होतो. याचे आपण पेपर मध्ये वाचलेले आहे.
 त्याचबरोबर मी काल कार ने खेड शिवापुर टोल नाक्यावर  येत असताना माझ्या समोरील गाडीचा फास्टट्रॅक चा प्रॉब्लेम होता, त्यामुळे त्याचे रिचार्ज होत नव्हते व इतर काही प्रॉब्लेम होता. त्यावेळी आम्ही 15 मिनिटं लाईन मध्येच थांबलो. त्यानंतर आम्ही  संबंधित टोल नाक्यावरती विचारण्या साठी गेलो. त्यावेळी आम्हाला अरेरावीची उत्तरे देण्यात आली.
 त्यानंतर आम्ही 15 मिनिटे वाट पाहिली, त्यानंतर आम्ही पुन्हा विचारणा केली त्यावेळी अक्षरशः टोलनाक्यावरती ग्रुपने जमून आम्हाला शिवीगाळ करण्यात आली. व अजून आम्ही 15 मिनिटे त्या ठिकाणी लाईन मध्ये थांबलो व 15 मिनिटांनी तर त्यांचे गुंड व स्वतः मालक व सर्व लोक येऊन अक्षरशा टोल प्रामाणिकपणे भरणाऱ्या लोकांना शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली.
 याचा मी माझ्या परिवाराच्या वतीने तीव्र निषेध करतो. व माझी प्रशासनास विनंती राहील इथून पुढे प्रवाशांना  टोल भरत असताना सुद्धा हा मानसिक त्रास जर होत असेल तर हा टोल नाका चालक व तेथील गुंड यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी माझी विनम्रपणे विनंती आहे .    -विष्णू सरगर सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पुणे शहर