Daksh Police Times
Daksh Police Times पिंपळे सौदागर येथील स्पॉट १८ मॉलमधील स्पा सेंटरमध्ये  सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचाअनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाने केला पर्दाफाश.
Tuesday, 09 Apr 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

पिंपळे सौदागर येथील स्पॉट १८ मॉलमधील स्पा सेंटरमध्ये (Spa center)  सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाने पर्दाफाश केला. मसाजच्या नावाखाली तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. यातून दोन तरुणींची पोलिसांनी सुटका केली आहे. ही कारवाई शनिवारी (६ एप्रिल) सायंकाळी करण्यात आली.

पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, साई चौक, पिंपळे सौदागर येथे असलेल्या स्पॉट १८ मॉलमध्ये 'द गोल्ड थाई' स्पा आहे. तिथे स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाला मिळाली. त्यानुसार शनिवारी सायंकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा मारला. त्यावेळी स्पा मॅनेजर दलाल महिला आणि स्पा मालक यांनी दोन तरुणींना जास्त पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतल्याचे उघडकीस आले. स्पा मॅनेजर महिलेला पोलिसांनी अटक केली, तर दोन तरुणींची वेश्या व्यवसायातून सुटका केली. स्पा मॅनेजर महिलेला अटक करण्यात आली आहे. तिच्यासह स्पा मालक रणजीत सिंह उर्फ नील राजपूत (वय ३०) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार गणेश कारोटे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.या कारवाईमध्ये पोलिसांनी तीन हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत. ही कारवाई निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस अंमलदार सुनील शिरसाट, मारुती करचुडे, भगवंता मुठे, गणेश कारोटे, सुधा टोके, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, सोनाली माने यांनी केली आहे.स्पा सेंटरच्या नावाखालील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दोन तरुणींची वेश्या व्यवसायातून सुटका
पिंपळे सौदागर येथील स्पॉट १८ मॉलमधील स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचाअनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाने पर्दाफाश केला.