Daksh Police Times
Daksh Police Times पंतप्रधान नरेंद्र मोदी १० एप्रिलला महाराष्ट्रात:कन्हान येथे जाहीर सभा .
Wednesday, 03 Apr 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

नागपूर :पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १० एप्रिलला सायंकाळी पाच वाजता त्यांची रामटेक लोकसभा मतदारसंघातील कन्हानमध्ये जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती स्थानिक भाजप नेत्यांनी दिली. या सभेच्या निमित्ताने राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात पंतप्रधान मोदी करतील.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला पूर्व विदर्भातील नागपूर, गडचिरोली, भंडारा -गोंदिया, रामटेक व चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. या पाच लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे दिग्गज नेते येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाल्याचे येथील भाजपा नेत्यांनी सांगितले. दहा तारखेला सायंकाळी पाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी रामटेक लोकसभा मतदारसंघातील कन्हान येथे जाहीर सभा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी गडमंदिराला भेट देण्याची शक्यता आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सहा एप्रिलला गोंदिया येथे जाहीर सभा होणार आहे. भाजपच्या विभागीय कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार शहा हे ६ एप्रिलला दुपारी ३ वाजता विमानाने दिल्लीहून नागपूर येथे येणार आहेत. येथून ते हेलिकॉप्टरने गोंदियाला जातील. ४ वाजता जाहीर सभा होईल.