Daksh Police Times
Daksh Police Times इंदिरा देणार विमान सेवा प्रशिक्षणार्थींना आंतरराष्ट्रीय दर्जाचे परिपूर्ण प्रशिक्षण. :आकाशात झेपावू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पंखांना देणार बळ.
Friday, 29 Mar 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

पिंपरी चिंचवड  :-  भारतीय हवाई क्षेत्रात येत्या दोन वर्षात हजारो विमानांचा ताफा दाखल होतं असून लाखो नोकऱ्यांची संधीही  उपलब्ध झाली आहे. त्या अनुषंगाने इंदिरा संस्थेने पुढचे पाऊल टाकत उंच आकाशी झेप घेण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या  विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देत नोकऱ्या देणार असल्याचे प्रतिपादन इंदिरा शिक्षण समुहाच्या अध्यक्षा डॉ. तरिता शंकर यांनी ताथवडे येथे केले.
        श्री चाणक्य एज्यूकेशन सोसायटीच्या इंदिरा शिक्षण समूहाने इंदिरा स्कुल ऑफ एव्हिएशन हे  हवाई क्षेत्रातील जागतिक दर्जाचे विविध प्रोफेशनल घडविणारे महाविदियालय सुरु केल्याची माहिती डॉ. तरिता शंकर यांनी बुधवारी (ता. २७) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंडीत माळी, इंदिरा स्कुल ऑफ एव्हीएशनच्या संचालिका नीतू रोशा, अभय अहिरे, रिचा मल्होत्रा उपस्थित होते. डॉ. तरीता शंकर पुढे म्हणाल्या, आताच्या हवाई क्षेत्राचा दृष्टीनकोन खूप बदलला आहे. या क्षेत्राशी माझं भावनिक नातं आहे.
       देशभरात विमानतळांची संख्या वाढत आहे. तसे मनुष्यबळाची मागणी वाढणार आहे त्यादृष्टीने कुशल मनुष्यबळ आम्ही इंडस्ट्रीला देणार आहोत असे ही त्या म्हणाल्या. माळी यांनी इंदिरा संस्थेच्या आजवरच्या यशस्वी शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेत संस्था आता हवाई क्षेत्रात पदार्पण करत असल्याचे नमूद केले. संस्थेने अनेक हवाई सेवा देणाऱ्या कंपन्यांसोबत करार केले असून ही संख्या वाढणार आहे. ग्राउंड स्टाफ पासून ते पायलट प्रशिक्षणापर्यंत सर्व अभ्यासक्रम यामाध्यमातून आम्ही देणार आहोत.' असे रोशा यांनी सांगितले.

या आहेत अभ्यासक्रम (कोर्स) व नोकरीच्या संधी.

केबिन क्रू :- इन-फ्लाइट सेवा आणि सुरक्षा, प्रवासी हाताळणी, आदरातिथ्य आणि ग्राहक सेवा.

व्यावसायिक पायलट परवाना :- ग्राऊंड क्लासेज़ - कमर्शियल पायलट, व्यावसायिक विमान पायलट, खाजगी जेट पायलट, उड्डाण प्रशिक्षक.

ग्राउंड स्टाफ :- विमानतळ ग्राहक समर्थन, एअरलाइन ग्राउंड क्रू, विमानतळ ऑपरेशन्स, अतिथी सेवा कर्मचारी. यासह अन्य सर्टिफिकेट कोर्सेस तज्ञ व अनुभवी स्टाफ मार्फत शिकविले जाणार आहेत. 
सुसज्ज कॅम्पसमध्ये प्रॅक्टिकलसाठी आधुनिक उपकरणे, आर्टिफिशल विमान असून सर्व सुविधा पुरविण्यात आल्याने आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्वोत्तम प्रशिक्षण मिळत आहे.