Daksh Police Times
Daksh Police Times कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये पाण्याचं भीषण संकट संकट ...
Friday, 29 Mar 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

मुंबई :कर्नाटकची राजधानी आणि भारतातला आयटी हब असलेल्या बेंगळुरूमध्ये पाण्याचं संकट अधिक भीषण होत आहे. आत्ता कुठे उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे आणि बेंगळुरू शहरात पाणीटंचाईची समस्या उद्भवली आहे. पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी शहरात अनावश्यक वापरामुळे होणारी पाण्याची नासाडी कमी करण्याकरिता कठोर पावलं उचलली जात आहेत. शहरात कार, बाइक, स्कूटर आणि इतर वाहनं धुण्यास बंदी घालण्यात आली आहे. कारण वाहनं धुण्यात खूप पाणी वाया जाते. एवढंच नाही तर इतर अनेक गोष्टींसाठी यंत्रणेने पाण्याच्या वापरावर बंदी घातली आहे. पाण्याची नासाडी करताना आढळल्यास दंड आकारला जाणार आहे. 
 उन्हाळ्याची चाहूल लागताच अनेक ठिकाणी पाणीटंचाईची भीषण समस्या जाणवू लागली आहे. कर्नाटकच्या राजधानीत तर परिस्थिती इतकी बिकट झाली आहे, की पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांकडून दंड आकारला जाईल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
बेंगळुरू पाणीपुरवठा आणि सिव्हरेज बोर्डाने (बीडब्ल्यूएसएसबी) शहरातल्या पाणी संकटाच्या पार्श्वभूमीवर वाहनं धुण्यासाठी, कारंजं आणि बागकामासाठी पाण्याचा वापर करण्यास बंदी घातली आहे. या नियमाचं उल्लंघन केल्यास पाच हजार रुपये दंड आकारण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली आहे. इतकंच नाही तर शहरात कोणी आदेशाचं उल्लंघन करताना दिसल्यास बीडब्ल्यूएसएसबी कॉल