Daksh Police Times
Daksh Police Times धनंजय मुंडेंनी परळीत केलं पंकजा मुंडेंचं स्वागत, तिघे भाऊ-बहिण एकत्र पाहून परळीकरही भारावले
Sunday, 24 Mar 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

बीड : Dhananjay Munde-Pankaja Munde | भाजपाच्या बीड लोकसभा मतदारसंघातील (Beed Lok Sabha) उमेदवार पंकजा मुंडे यांचे आज परळीत जेसीबीतून फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आले. पंकजा आणि प्रीतम मुंडे यांच्या स्वागताला स्वता पालकमंत्री धनंजय मुंडे आले होते. यावेळी, तिघे भाऊ-बहीण अनेक वर्षांनंतर एकत्र आल्याचे पाहून परळीकरही भारावले.

पंकजा मुंडे यांचे स्वागत करतातना भावुक झालेले धनंजय मुंडे म्हणाले, माझ्यासाठी हा अत्यंत भावनिक दिवस आहे. ताईंना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांचे स्वागत जिल्ह्याच्या बॉर्डवरच मी करायला सांगितले होते. मात्र ताईंनी सांगितले की, तू पालकमंत्री आहेस, तू घरी थांब. मी तिथे भेटायला येईन. परंतु मी तिचा मोठा भाऊ आहे, त्यामुळे मनाचा मोठेपणाही दाखवला पाहिजे, म्हणून सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून मी स्वागतासाठी आलो.

आज परळीत आल्यानंतर पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि प्रितम मुंडे यांनी गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

यावेळी धनंजय मुंडे म्हणाले, आजचा क्षण माझ्यासाठी भावनिक आणि आनंदी आहे. कारण, २००९ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुकांसाठी पंकजाताई उभ्या राहिल्या होत्या, तेव्हा मी मुख्य प्रचारक होतो. आता, लोकसभा निवडणुकीसाठी पंकजा मुंडे उभ्या आहेत. ज्या गोष्टी घडू नयेत त्या घडल्या, नियतीने पुन्हा ज्या गोष्टी घडाव्यात, त्या घडवून आणल्या. याचा मोठा भाऊ म्हणून मला आनंद आहे. बाकी ४ जूनला निकालाच्या दिवशी मी बोलेन.

यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या बजरंग सोनावणे (Bajrang Sonwane) यांच्यावर टीका करताना धनंजय मुंडे म्हणाले, महायुतीतील जे कोणी सोडून गेले, ते का गेले, याची कारणे शोधून काढली पाहिजेत. त्यांची अति महत्वाकांक्षा याला कारणीभूत आहे.

धनंजय मुंडे पुढे म्हणाले, मागच्या निवडणुकीत आघाडी म्हणून आम्हीच त्यांचे काम केले होते.
मात्र त्यांची ऐपत काय आहे, हे सर्वांना माहीत आहे.
त्यांना आपल्या बहिणीला नगरपंचायत निवडणुकीत निवडून आणता आलं नाही, साधी ग्रामपंचायत निवडणूकही जिंकता आली नाही.सोनावणे यांच्यावर टीका करताना धनंजय मुंडे म्हणाले, जे जाणार होते,
त्यांनी अगोदरच तयारी केली होती. आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते थांबले नाहीत.
ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग आहे. आमचा प्रारब्ध होता, तो आज संपला आहे.
आम्ही सर्व कुटुंब आता एकत्र आहोत. आता कुणाचा प्रारब्ध सुरू करायचा ते आम्ही तिघं बहिण-भाऊ ठरवू.