Daksh Police Times
Daksh Police Times तरुणावर शस्त्राने वार करुन दहशत पसरवणाऱ्या तरुणाला अटक
Saturday, 23 Mar 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime | गप्पा मारत थांबलेल्या दोन तरुणांना मारहाण करुन एकावर धारदार हत्याराने वार करुन जखमी केले (Stabbing Case). तसेच रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना शिवीगाळ करुन दहशत पसरवणाऱ्या तरुणाला देहुरोड पोलिसांनी (Dehuroad Police) अटक केली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.21) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास के.एम. पार्क सोसायटीच्या (KM Park Society) जवळ असलेल्या मोकळ्या मैदानात घडला.

याबाबत सुधीर हनुमंता तेलगु (वय-20 रा. मरीमाता मंदीराजवळ, शितानगर, देहुरोड) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात (Dehuraod Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन आकाश पिल्ले (वय-23 रा. गांधी नगर, देहुरोड) याच्यावर आयपीसी 324, 323, 506(2), 34 सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचा आतेभाऊ व मित्रासोबत मैदानात गप्पा मारत थांबले होते.
त्यावेळी आरोपी आकाश पिल्ले व त्याचे दोन अनोळखी साथीदार त्याठिकाणी आले.
त्यांनी फिर्य़ादी यांच्या आतेभावाला हाताने मारहाण केली. तर फिर्यादी यांच्या दोन्ही हातावर धारदार शस्त्राने वार करुन
गंभीर जखमी केले. तसेच रस्त्याने जाणारे येणारे लोकांना शिवीगाळ करुन परीसरामध्ये दहशत पसरवली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कदम करीत आहेत.