Daksh Police Times
Pune : Daksh Police Times पुणे पोलीस आयुक्तालयाचे रुप पालटणार, राज्य सरकारकडून 193 कोटींचा निधी
Saturday, 23 Mar 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

Pune : Daksh Police Times ,Pune CP Office New Building | पुणे पोलीस आयुक्तालयाच्या आवारात नवीन अत्याधुनिक सुविधा असलेल्या इमारतीसाठी गृह विभागाने शनिवारी (दि.16) 193 कोटी 80 लाख 59 हजार 404 रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नवीन इमारतीचे काम केले जाणार आहे. (Pune CP Office New Building)

पुणे शहराचा दिवसेंदिवस विस्तार वाढत असल्याने पोलीस ठाण्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पुणे शहर आयुक्तालयातील इमारत अपुरी पडत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या धर्तीवर पुणे पोलीस आयुक्तालयात नवीन अत्याधुनिक इमारत बांधण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तालयाची सध्याची इमारत कामकाजाच्या दृष्टीने अपुरी पडत होती. त्यामुळे नवी इमारत बांधण्यास परवानगी तसेच निधी उपलब्ध करुन देण्यासाठी मागिल काही महिन्यांपासून पाठपुरावा करण्यात येत होता.

पोलीस महासंचालक कार्यालयाकडून सादर करण्यात आलेल्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी 242 कोटी 99 लाख 91 हजार 115 रुपये अपेक्षित असल्याचे अंदाजपत्रकात नमूद करण्यात आले होते. प्रशासकीय मान्यतेसाठी अंदाजपत्रक पाठवण्यात आले होते.

 

मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची 11 मार्च रोजी बैठक झाली.
या बैठकीत 193 कोटी 80 लाख 59 हजार 404 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
याबाबतचे आदेश महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव नारायण बिरा माने यांनी शनिवारी काढले.
पोलीस आयुक्तालयाचा भूखंड गृह विभाग, महाराष्ट्र शासनाच्या नावावर आहे.
याबाबत खात्री केल्यानंतर काम सुरू करण्यात यावे.
कामाच्या निविदा मागविण्याचा आधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सक्षम अधिकाऱ्यांची तांत्रिक मंजुरी घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष निधी उपलब्ध झाल्याशिवाय काम सुरू करण्यात येऊ नये, असे शासन निर्णयात नमूद केले आहे.

#पुणे #पोलीस #आयुक्तालय #रुपपालटण #राज्यसरकार #निधी #महाराष्ट्र #सुरक्षा #पुलिस #विकास #विश्वास #कार्यवाही #शांतता #सुरक्षित #व्यवस्था #विकासाचीप्राथमिकता #आदर्शपोलीस #प्रगती #न्याय #सुरक्षितआणिसुरक्षित #शांततेचावातानुसार #महिलासुरक्षा