काँग्रेस महाराष्ट्रात तब्बत 18 जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे आजच्या बैठकीत या 18 उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली यापैकी काही उमेदवार निश्चित झाले आहेत. काँग्रेसच्या या लोकसभा उमेदवारांची यादी टीव्ही 9 मराठी'च्या हाती लागली आहे. या यादीतून अतिशय महत्त्वाची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे पुण्यात महाविकास आघाडीकडून कोण mpउमेदवार राहीत? याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क तहवले जात होते. मनसेता सोडचिठ्ठी देणारे नेते वसंत मोरे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली जाईत, अशी चर्चा होती पण आता काँग्रेसच्या यादीत पुण्याच्या उमेदवाराचं नाव निश्चित करण्यात आलं आहे त्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांचं नाव पुणे लोकसभा मतदारसंघासाठी निधित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापुरातून प्रणिती शिंदे, पुण्यातून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी दिती आहे. तर अमरावतीतून NC बळवंत वानखेडे, नंदुरबारमधून के सी. पाडवी यांचे चिरंजीव, गडचिरोलीतून नामदेव उसेंडी यांना उमेदवारी दिल्याचं निश्चित झालं आहे. कोल्हापुरात शाहू छत्रपती महाराजांना उमेदवारी दिल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेसच्या उमेदवारांची अधिकृत यादी उद्या किंवा परवा जाहीर करण्यात येणार आहे या यादीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेले आहे. पण त्याआधी काही निश्चित झालेल्या उमेदवारांची नावे 'टीव्ही 9 मराठी च्या हाती लागली आहेत.
काँग्रेसकडून 'या' उमेदवारांची नावे निक्षित
चंद्रपूर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार अमरावती - आ. बळवंत वानखेडे
नागपूर- आ विकास ठाकरे
सोलापूर - आ प्रणिती शिंदे
कोल्हापूर-ग्राहू छुत्रपती
पुणे- आ. रवींद्र धंगेकर
नंदुरबार - गोवाया पाडवी (के सी पाडवी यांचा मुलगा),
नागपूर आ.विकास ठाकरे
गोंदिया- भंडारा प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले गडचिरोली- नामदेव किरसान
अकोला - अभय पाटील
नांदेड- वसंतराव चव्हाण
लातूर- डॉ कलगे
दोन किंवा तीन जागांसाठी चर्चा सुरु, वडेट्टीवार यांची माहिती महाविकास आघाडीची मुंबईत उद्या सकाळी दहा वाजता एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटपाचा तिढा सोडवण्यात येणार
आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिल्लीतील बैठकीनंतर टीव्ही 9 मराठीता प्रतिक्रिया दिली. "आता फार काही वाद राहिलेला नाही. दोन किंवा तीन जागांच्या संदर्भात चर्चा सुरु आहे त्याबाबत अंतिम निर्णय बाकी आहे याबाबत उद्या सकाळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत निर्णय घेतता जाणार आहे, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली