Daksh Police Times
Pune : Daksh Police Times येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंद्यांसाठी ई-लायब्ररीची सुविधा
Wednesday, 20 Mar 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

Yerawada Jail News | कारागृहातील बंद्यांना व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, विज्ञान आदी क्षेत्रातील प्रसिद्ध पुस्तके संगणकावर पीडीएफ स्वरुपात वाचण्यासाठी उपलब्ध व्हावीत यासाठी येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये ई-लायब्ररीची सुविधा सुरु करण्यात आली असून या लायब्ररीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. के. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.(Yerawada Jail News)

यावेळी गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनिल ढमाळ, उपअधीक्षक डॉ. भाईदास ढोले, पी. पी. कदम, आर. ई गायकवाड, एम. एच. जगताप, वरिष्ठ तुरुंग अधिकारी आनंदा कांदे आदी उपस्थित होते.

कारागृहातील बंद्यांसाठी ‘ई-लायब्ररी’ हा उपक्रम अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा
अमिताभ गुप्ता व विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या संकल्पनेतून व पश्चिम विभागाच्या
कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
या ई-लायब्ररीमध्ये विविध पुस्तके पीडीएफ स्वरुपात संगणकावर बंद्यांना वाचनासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली
असून या उपक्रमामुळे बंद्यांमध्ये सकारात्मक भावना वृद्धिंगत होण्यास निश्चितच मदत होणार आहे,
असे कारागृहाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

daksh police times