Daksh Police Times
Pune : Daksh Police Times तडीपार आरोपी हा कोयता घेवुन फिरत असताना मिळुन आल्याने सिंहगडरोड पोलीसांनी त्यास शिताफीने पकडुन केली अटक
Tuesday, 19 Mar 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

तडीपार आरोपी हा कोयता घेवुन फिरत असताना मिळुन आल्याने सिंहगडरोड पोलीसांनी त्यास शिताफीने पकडुन केली अटक

सदर बाबत अधिक माहिती अशी की, सिंहगडरोड पोलीस स्टेशन हाद्दीत रेकॉर्डवरील आरोपी तसेच संशयीत इसम व गुन्हयाना आळा घालण्यासाठी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिहगडरोड पो स्टे पुणे व मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे), सिहगडरोड पोलीस स्टेशन पुणे शहर याचे आदेशाने गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत असताना धायरी मार्शल वरिल पोलीस अंमलदार पोहवा/६९३२ कटके व पोलीस अंमलदार/१०१८८ कोकाटे यांना कॉल प्राप्त झाला की, खंडोबाचा माळ येथे एक व्यक्ति सदर भागात कोयता घेवुन फिरत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी सपोनि प्रविण जाधव यांना कळविली असता त्यांनी ती वरिष्ठांना कळवुन वरिष्ठांनी योग्यती कारवाई करण्याचे आदेशित केल्याने सदर बातमीच्या ठिकाणी जावुन मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री करता बातमीतील वरील वर्णनाचा इसम सदर ठिकाणी उभा असल्याचे दिसले. त्याची व आमची नजरा नजर होताच तो इसम त्या ठिकाणावरुन नजर चुकवुन पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यास स्टाफचे मदतीने त्याचा पाठलाग करुन काही अंतरावर त्याला शिताफीने पकडुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव दत्तात्रय पांडुरंग मरगळे वय-२२ वर्षे रा. पाण्याचे टाकीजवळ रायकरमळा धायरी पुणे असे सांगितले असता त्याची पंचासमक्ष अंगझडती घेता त्याचे डावे बाजुचे कंबरेस जिन्स पॅन्टच्या आत मध्ये एक २००/-रुपये किंमतीचा एक लोखंडी कोयता मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला असुन पुढील तपास सहा. पोलीस उप निरीक्षक आबा उत्तेकर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी श्री. संभाजी कदम सोो, मा. पोलीस उपआयुक्त परीमंडळ -३, श्री भिमराव टेळे सोो, सहा. पोलीस आयुक्त साो, कोथरुड विभाग अतिरिक्त कार्याभार, सिंहगडरोड विभाग श्री विजय कुंभार साो, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री राघवेंद्रसिंह क्षीरसागर सो, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक श्री प्रविण जाधव, पोलीस उप निरीक्षक श्री श्रीकांत सावंत पोलीस अंमलदार, विशाल गवळी, सौरभ कटके, संतोष शेंडे, यांचे पथकाने केली.

Daksh Police Times