Daksh Police Times
Pune : Daksh Police Times वारजे माळवाडी पोलीस ठाण्याला, मिळणार आता हक्काची इमारत
Sunday, 10 Mar 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

उपमुख्यमंत्री व‌ गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्राधान्य क्रमाने हा विषय मार्गी लावणार असल्याचे सांगितले.

खडकवासला : वारजे माळवाडी पोलीस ठाण्याची आरक्षित जागा आहे. ती जागा आयुक्त विक्रम कुमार यांनी आम्हाला तात्काळ द्यावी. मी प्राधान्य क्रमाने येथे आधुनिक व चांगले पोलीस ठाण्याचे करून देण्याचे आदेश देतो.‌ असे आश्वासन उपमुख्यमंत्री व‌ गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारजे माळवाडी येथे बोलताना दिले.

वारजे माळवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सह अन्य विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार भीमराव तापकीर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पीएमआरडीए’चे संचालक रमेश कोंडे, माजी आमदार जगदीश मुळीक, योगेश टीळेकर, माजी नगरसेवक दिलीप बराटे, दीपक मानकर, धीरज घाटे, हेमंत रासने, गणेश बिडकर, बाबा धुमाळ, किरण बारटक्के,

सचिन दोडके, दिपाली धुमाळ, सायली वांजळे, वृषाली चौधरी, हरिदास चरवड, किरण दगडे, कात्रज’ दुध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर, निमंत्रक रूरल एन्हान्सर्सचे पुणे‌ नेदरलँडचे व्यवस्थापकीय संचालक अंबर आयदे उपस्थित होते. वारजे अतुल नगरजवळ कै.अरविंद बारटक्के हॉस्पिटल येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल‌ उभे राहत आहे.

यावेळी आमदार भीमराव तापकीर यांनी सांगितले की, वारजे माळवाडी पोलीस ठाणे २०११ साली सुरू झाले. सध्याची पोलिस ठाण्याची इमारत ही वारजे ग्रामपंचायतिच्या इमारतीत आहे. गावं पालिकेत गेल्यावर येथे पालिकेचे विभागीय कार्यालय सुरु झाले.

कोथरूड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून २०११ मध्ये हे पोलिस ठाणे सुरु झाले. त्यावेळी, पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले होते. हे पोलीस स्टेशन सध्या दीड गुंठ्याच्या जागेत सध्या सुरू आहे. परंतु या पोलीस ठाण्यासाठी पालिकेच्या विकास आराखड्यात आरएमडी सिंहगड कॉलेज जवळ दोन एकर जागा आरक्षित आहे.

ती जागा ताब्यात घेण्यासाठी पोलिस आयुक्त कार्यालयामार्फत प्रयत्न झाले. त्यावेळी महापालिका आयुक्तांनी याचे मूल्यांकन भरा आणि ती जागा ताब्यात घ्या. असे सांगितले त्यानुसार 2022 मध्ये पैसे भरण्याची पूर्तता करण्यात आली.

परंतु या जागेचा अद्याप ताबा मिळालेला नाही. पोलीस ठाण्याची जागा मालक मारुती नवले यांची आहे. त्यांना बोलून आपण हा प्रश्न सोडवावा. या परिसरात शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी फायदा होईल. अशी मागणी आमदार तापकीर यांनी सांगितले.

याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, कार्यक्रमाला उपस्थित महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे पाहत आरक्षणाची ही जागा तात्काळ आम्हाला द्या.

त्या जागेवर वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचा विषय मी प्रायोरिटी लिस्ट मध्ये टाकून आधुनिक चांगल्या प्रकारचे पोलीस ठाण्याची इमारत उभी करून देण्याचे आदेश या ठिकाणी देत आहोत. आणि या परिसरात कायदा सुव्यवस्था व शांतता राखण्यासाठी याचा फायदा होईल असे फडणवीस यांनी सांगितले.यामुळे आता वारजे माळवाडी पोलिस ठाण्याला आधुनिक हक्काची इमारत उभी राहणार आहे.

Daksh Police Times